Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Starcast Fees : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा तगडी स्टारकास्ट असलेला बिग बजेट सिनेमा आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'भाईजान'ने किती घेतलं मानधन? (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman Khan Fees) 


'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. हा सिनेमा येत्या 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात भाईजानचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये सलमान खूपच हॅंडसम दिसत आहे. आता या बहुचर्चित सिनेमासाठी सलमानने किती मानधन घेतलं याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, भाईजानने 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमासाठी 50 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. 


एका झलकसाठी राम चरणने किती रुपये आकारले? (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Ram Charan Fees)


'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता 'आरआरआर' (RRR) फेम राम चरणची (Ram Charan) झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका झलकसाठी राम चरणने तीन कोटी रुपये घेतले आहेत. 'आरआरआर' नंतर राम चरणची क्रेझ चांगलीच वाढली आहे. आता 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास राम चरण सज्ज आहे. 


'किसी का भाई किसी की जान' सिनेमातील कलाकारांच्या मानधनाबद्दल जाणून घ्या...


'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात सलमान खान, पूजा हेगडेसह, वेंकटेश दग्गुबाती आणि पूजा हेगडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच राम चरणची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी वेंकटेश दग्गुबाती या सिनेमात सलमानच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने या सिनेमासाठी आठ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तर सलमानसोबत मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या पूजा हेगडेने या सिनेमासाठी पाच कोटी रुपये मानधन घेतलं आहे. दुसरीकडे शहनाज गिलने या सिनेमासाठी 55 लाख रुपये तर जस्सी गिलने 70 लाख रुपये आकारले आहेत. 


'किसी का भाई किसी की जान' कधी होणार रिलीज? (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Release Date) 


सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा फरहाद सामजीने सांभाळली आहे.. या सिनेमात जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंह, अभिमन्यू सिंह, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे कलाकारदेखील झळकणार आहेत. हा सिनेमा 21 एप्रिल 2023 रोजी ईदच्या मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer: 'मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं'; सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज