Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer:

  बॉलिवूडचा भाईजान  सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये सलमानचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला  'मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं' हा सलमानचा डायलॉग ऐकू येत आहे.


'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या  ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त तडका बघायला मिळत आहे.  सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता सलमानानं इन्स्टाग्रामवर 'किसी का भाई किसी की जान'  चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करुन त्यानं लिहिलं, 'तुमच्या भाई आणि जानसोबत तुम्ही हा ट्रेलर पाहिलात?'


पाहा ट्रेलर: 






 


‘किसी का भाई किसी की जान’ कधी होणार रिलीज?


21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खानच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  'येंटम्मा',  'नय्यो लगदा', 'बिल्ली बिल्ली' आणि 'जी रहे थे हम' ही किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधील गाणी प्रेक्षकांच्या भेटील आली आहेत. 






'किसी का भाई किसी की जान' ची स्टार कास्ट


किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेसोबतच  शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  किसी का भाई किसी की जान या चित्रपटात सलमान आणि पूजाची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


सलमानचे आगामी चित्रपट


सलमान खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'टायगर 3'मध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ram Charan: 'माझं स्वप्न पूर्ण झालं'; सलमानसोबत ‘येंतम्मा’ गाण्यावर डान्स केल्यानंतर राम चरणची प्रतिक्रिया