Vivek Agnihotri On Bollywood Industry : सिने-निर्माता आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) अनेकदा सिनेमांसह वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याचं मत मांडत असतो. विके अग्निहोत्री आता म्हणाला,"ज्या गोष्टींबद्दल मला माहिती आहे. त्याच गोष्टींवर मी लिहितो. आता बॉलिवूड इंडस्ट्रीत मला बदल हवा आहे".
विवेक अग्निहोत्री काय म्हणाले? Vivek Agnihotri On Bollywood Industry
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत विकेक अग्निहोत्री म्हणाला,"मला समजत नसलेल्या गोष्टींवर मी कधीच बोलत नाही. भाषिक वाद आणि अशा पद्धतीच्या गोष्टींवर भाष्य करायला मला आवडत नाही. पण बॉलिवूडबद्दल बोलायला मला नक्कीच आवडेल".
विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाला,"माझी कोणतीही तक्रार नाही. पण मी बॉलिवूडबद्दल बोलतो, कारण मला बॉलिवूडमध्ये बदल हवा आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीने स्वत:ला नवं रुप देण्याची गरज आहे. बॉलिवूड ही जगातील सर्वोत्कृष्ट फिल्म इंडस्ट्री व्हावी अशी माझी इच्छा आहे. बॉलिवूड भारतासाठी अभिमानास्पद असायला हवं. जगाला बॉलिवूडची गाणी आवडतात पण कथानक नाही.
विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. 'द काश्मीर फाइल्स'नंतर चाहते आता 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'द वॅक्सीन वॉर' 15 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
विवेक अग्निहोत्रीचा 'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा प्रचंड गाजला होता. एकीकडे या सिनेमावर टीका होत असताना काही नेत्यांनी मात्र या सिनेमाचे खास शो आयोजित केले होते. या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहते प्रतीक्षा करत असताना विवेक अग्निहोत्रींनी 'द वॅक्सीन वॉर' या सिनेमाची घोषणा केली.
संबंधित बातम्या