Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) बहुचर्चित सिनेमांपैकी एक असलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहची (Ranveer Singh) जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकली आहे. याआधी 'गली बॉय' या सिनेमात ते एकत्र झळकले होते.


'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या माध्यमातून करण जौहरने सात वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत होता. अखेर आता सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे ओपनिंग डेला या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी 11.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अधिकृत आकडेवारी आल्यानंतर यात थोडा बदल असू शकतो.


160 कोटींच्या बजेटमध्ये 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. पण रिलीजच्या पहिल्या दिवशीची कमाई अपेक्षेप्रमाणे नाही. आता वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.






'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या सिनेमात रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्याशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा देशभरातील 3200 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.


बंगाली मुलगी आणि पंजाबच्या मुलाची हटके लवस्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रणवीरने या सिनेमात रॉकी रंधावाची भूमिका साकारलीआहे. तर आलिया रानीच्या भूमिकेत दिसत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचं कथानक इथिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलं आहे. 


संबंधित बातम्या


Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'... मनोरंजनाचे उत्तम पॅकेज