Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड' (The Kashmir Files Unreported) ही सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. विवेक अग्निहोत्री सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपलं मत मांडत असतात. 'द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड'च्या ट्रेलरला नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एका यूजरने ट्वीट करत अग्निहोत्रींकडे 'मणिपूर फाईल्स' (Manipur Files) बनवण्याची मागणी केली आहे.


मणिपूरमधील  लज्जास्पद घटनेवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. मणिपूरमधील एका समूदायाने न आदिवासी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली होती, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान विवेक अग्निहोत्रींनी 'मणिपूर फाईल्स'ची निर्मिती करण्याची मागणी केली गेली. 


विवेक अग्निहोत्रींनी ट्वीट करत दिलं उत्तर


एका यूजरने लिहिलं आहे,"विवेक अग्निहोत्री तुम्ही वेळ वाया घालवू नका. तुम्ही एक चांगले व्यक्ती असला तर जा आणि मणिपूर फाईल्सची निर्मिती करा". यावर उत्तर देत विवेक अग्निहोत्रींनी ट्वीट केलं आहे,"माझ्यावर इतका विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. पण सर्वच सिनेमांची निर्मिती मीच करायची का? तुमच्या 'टीम इंडिया'मध्ये एकही पुरुष निर्माता नाही?".






विवेक अग्निहोत्रीचे हे उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. मणिपूरमधील घटनेवरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. विवेक अग्निहोत्रीसह जया बच्चन अक्षय कुमार, सोनू सूद, अनुपम खेर या सेलिब्रिटींनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.


विवेक अग्निहोत्री यांची 'द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड' (The Kashmir Files Unreported) ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच त्यांचा 'वॅक्सीन वॉर' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या सिनेमाची घोषणा केली होती.


संबंधित बातम्या


Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला