Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्तचा (Sanjay Dutt) आज वाढदिवस आहे. संजय दत्त वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असला तरी प्रेक्षकांसाठी मात्र सुपरस्टार आहे. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. बॉलिवूडच्या 'संजू बाबा'चे वैयक्तिक आयुष्य एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. संजयच्या आयुष्यात अनेक चढउतार आले.


बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात...


संजय दत्तने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. 'रेशमा' (Reshma) या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1972 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 1981 मध्ये संजयने 'रॉकी' (Rocky) या सिनेमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काम करायला सुरुवात केली. त्याचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. 


आईच्या आकस्मिक निधनाने संजय खूप एकटा पडला होता. संजयला अंमली पदार्थांचं व्यसन लागलं. त्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. संजयने आजवर एकापेक्षा एक हिट सिनेमांत काम केलं आहे. 1987 मध्ये त्याने रिचा शर्मासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या नऊ वर्षांनी रिचाचं ब्रेन ट्युमरमुळे निधन झालं. त्यानंतर संजय पुन्हा एकटा पडला. त्यानंतर त्याने या पिल्लईसोबत दुसरं लग्न केलं. पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. 


'मुन्नाभाई एमबीबीएस'  या सिनेमाच्या माध्यमातून संजयने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. त्यामुळे आपल्या अभिनयाने त्याने सर्वांना थक्क केले. यानंतर 2008 मध्ये संजूने मान्यतासोबत लग्न केलं. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडमध्ये आपली दुसरी इनिंग सुरू केली. संजयच्या आयु्ष्यावर आधारित असलेला 'संजू' हा सिनेमाही काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


जाणून घ्या संजू बाबाच्या संपत्तीबद्दल... (Sanjay Dutt Net Worth)


संजय दत्त 150 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. दर महिन्याला तो एक कोटी रुपये कमावतो. त्याच्याकडे अनेक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. एका सिनेमासाठी तो सहा ते आठ कोटी रुपये मानधन घेतो. संजयचं मुंबईत एक आलिशान घरदेखील आहे. या बंगल्याची किंमत सात कोटी रुपये आहे. 


संजय दत्तचे सर्वोत्कृष्ट सिनेमे कोणते? (Sanjay Datt best Movies)


सुनील दत्त दिग्दर्शित 'रॉकी' या सिनेमाच्या माध्यमातून संजयने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. संजयची मुख्य भूमिका असलेला 'नाम' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील 'चिठ्ठी आई है' हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. महेश भट्ट दिग्दर्शित सडक या सिनेमात संजय मुख्य भूमिकेत होता. त्याचे 'साजन', 'कुरुक्षेत्र' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' हे सिनेमेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.


संबंधित बातम्या


Sanjay Dutt : संजय दत्त शूटिंगदरम्यान गंभीर जखमी? मुन्नाभाई ट्वीट करत म्हणाला...