मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या आपला चित्रपट 'मलंग'मुळे चर्चेत असून बॉक्सऑफिसवर मलंगला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनने आतापर्यंत 50 कोटींचा टप्पाही पार केला आहे. परंतु, सध्या दिशा चित्रपटामुळे नाही तर एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. दिशा रविवारी रात्री एका पार्टिसाठी गेली होती. पार्टिमधून बाहेर पडल्यानंतर एका फोटोग्राफरने फोटो काढण्यासाठी दिशाला विचारलं. त्यावेळी दिशाचा बॉडिगार्ड भडकला आणि त्याने फोटोग्राफरला धक्का दिला. त्यावेळी फोटोग्राफर आणि बॉडिगार्डमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या वादावादीच्या व्हिडीओ फोटोग्राफर व्हायरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.


व्हिडीओमध्ये दिशा पाटनी पार्टिमधून बाहेर पडताना दिसत आहे. बाहेर अनेक फॅन्स आणि फोटोग्राफर्स दिशाला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्यामधून वाट काढत दिशा कशीबशी आपल्या गाडीपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. यादरम्यान, एक फोटोग्राफर तिला फोटो काढण्यासाठी विचारतो.





दिशा पाटनीचा बॉडिगार्ड दिशा आणि फोटोग्राफरच्या मध्ये येऊन उभा राहतो. तसेच फोटोग्राफरला असं करू नको सांगतो. पण फोटोग्राफर दिशा फोटो न मिळाल्यामुळे नाराज होतो. अशातच बॉडिगार्ड आणि फोटोग्राफरमध्ये वाद सुरू होतो. व्हिडीओमध्ये दोघांमधील वाद दिसत आहे.


PHOTO : 'मलंग'च्या प्रमोशदरम्यान स्पॉट झाली दिशा पाटनी; लूक होतोय व्हायरल


घटना घडल्यानंतर दिशाच्या मॅनेजरने दुःख व्यक्त करत फोटोग्राफरची माफी मागितली आहे. वीरल भयानीने कॅप्शन देत व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, 'एकही असा दिवस जात नाही, ज्यावेळी अशा परिस्थितीचा सामना करावा लागत नाही.'


दरम्यान, दिशा पाटनी लवकरच सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आगामी चित्रपट 'राधे'मध्ये दिशा बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानसोबत दिसून येणार आहे. 22 मे रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटा जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डादेखील दिसून येणार आहेत. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभु देवा करणार आहे.


संबंधित बातम्या : 


Sooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित


'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज


65th Amazon Filmfare Awards 2020: 'गली बॉय'ने पटकावला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा किताब, ही आहे पुरस्कारांची संपूर्ण यादी


'जयेशभाई जोरदार'मध्ये बोमन ईराणींची एन्ट्री; रणवीर सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार


रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज


First Look : 'लाल सिंह चड्ढा'मध्ये असा असेल करीना कपूरचा लूक; नवं पोस्टर रिलीज