Laal Singh Chaddha : आमिर खान आणि करीना कपूर खान स्टारर चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'चं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये करीना कपूर खानला फीचर करण्यात आलं आहे. आमिर खानने सोशल मीडियावर हे पोस्टर रिलीज केलं आहे.





हे पोस्टर शेअर करताना आमिर खानने लिहिलं आहे की, 'काहीतर मिळवण्यासाठीची धडपड आणि काहीतर गमावण्याची भिती... फक्त एवढाच आहे आयुष्याचा प्रवास.' याचसोबत त्याने करिना कपूर खानला व्हेलेंटाइन डे निमित्ताने शुभेच्छाही दिल्या. त्यांनी लिहिलं आहे की, 'हॅप्पी व्हेलेंटाइन डे करीना, काश मी तुझ्यासोबत प्रत्येक चित्रपटात रोमान्स करता आला असता, हे मला नॅचरली फील होत आहे. लव्ह.'





काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये नेहमीप्रमाणे आमिरचा हटके लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं एक पोस्टरही रिलीज करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये आमिरने पगडी घातलेली आहे, तसेच त्याने दाढीही वाढवलेली दिसत आहे.


दरम्यान, आमिर खानला या चित्रपटासाठी मोठ्या ट्रान्सफॉर्मेशनमधून जावं लागलं. त्यासाठी त्याने फार मेहनतही घेतली आहे. आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. आमिर आपल्या प्रत्येक चित्रपटात छोट्या छोट्या बारकावे मांडताना दिसतो. मग चित्रपटातील त्याचा लूक असो किंवा एखादा विषय मांडण्याची पद्धत. आमिर प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने मांडताना दिसली आहे.


आधी सिनेमाचा आकर्षक लोगो आणि आता सिनेमाचा फर्स्ट लूकमुळे सिनेमाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा 2020 मध्ये ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे. आमिर खान सिनेमात एक पंजाबी व्यक्तीरेखा साकारत आहे.


'लाल सिंह चड्ढा' सिनेमा 1994 ला रिलीज झालेल्या रॉबर्ट जेमेकिसच्या ऑस्कर विजेत्या 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमावर आधारित आहे. 'फॉरेस्ट गम्प' सिनेमात टॉम हँग्स आणि रॉबिन राईट मुख्य भूमिकेत होते. 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि आमिर खान प्रोड्युस करत आहेत. अद्वैत चंदन या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.


संबंधित बातम्या : 


Laal Singh Chaddha First Look | आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'मधील फर्स्ट लूक रिलीज


'लाल सिंह चड्डा'च्या शुटिंगमधून आमिर खानचा ब्रेक; अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील फोटो व्हायरल


'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज


बहुप्रतिक्षीत 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज; बॉलिवूडचे महानायक दिसणार मुख्य भूमिकेत