मुंबई : बॉलिवूडच्या अल्पवयीन अभिनेत्रीसोबत झालेल्या विनयभंग प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा झालेल्या विकास सचदेवनं हायकोर्टात अपील केलं आहे. या आरोपीला मुंबईतील दिंडोशी कोर्टानं पोक्सो अंतर्गत दोषी ठरवलं आहे. तीन वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, कायद्यानुसार विकास सचदेवनं जामीनासाठी केलेला अर्ज स्वीकारत त्याला 25 हजारांचा जामीन मंजूर करत तीन वर्षांच्या शिक्षेलाही कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सचदेव यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर 2 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे.


विकास सचदेव हा व्यावसायिक असून तो एका नावाजलेल्या मनोरंजन कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. 9 डिसेंबर 2017 च्या रात्री दिल्लीहून मुंबईत येत असताना विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात विकासनं आपला विनयभंग केल्याचा आरोप या अल्पवयीन बॉलिवूड अभिनेत्रीनं केला होता. मात्र, आरोपीच्या पत्नी दिव्या सचदेव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत केवळ चर्चेत राहण्यासाठी अभिनेत्रीनं हे आरोप करत केल्याचा दावा केला आहे. झोपलेल्या व्यक्तीचा पाय पुढच्या सीटपर्यंत गेला, तर त्याला लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग म्हणायचं का? असा दावा सचदेव यांच्यावतीनं करण्यात आला आहे.

जयललितांची डुप्लिकेट; 'थलाइवी'मधील कंगनाचा न ओळखता येणारा लूक व्हायरल

सोशल मीडियावरून मांडली व्यथा -
मात्र, मुलीनं सत्र न्यायालयात सांगितलं की, "सुरुवातीला विमान हेलकावे खात असल्याच्या कारणावरुन आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मात्र, त्यानंतर विमानातील दिवे बंद होताच त्यानं पुन्हा असभ्य वर्तन केलं. तेव्हा मी व्हिडीओ काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, लाईटच्या कमतरतेमुळे ते शक्य झालं नाही. सीटच्या मागून हा इसम माझ्या पाठीला आणि मानेला पाय लावत होता. क्रू मेंबर्सकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही दाद न दिल्यामुळे मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सोशल मीडियावरून आपली व्यथा मांडली. घडलेला प्रकार पाहता देशातील मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का?" असा सवाल तिनं उपस्थित केला होता. या संपूर्ण प्रकाराची मुंबई पोलिसांसह महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली होती.

Sex Racket | सेक्स रॅकेटधील चार अभिनेत्रीची पोलिसांकडून सुटका | ABP Majha