मुंबई : आसामधील गुवाहाटीमध्ये 65व्या अॅमेझॉन फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020 चं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 65व्या अॅमेझॉन फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020 मध्ये सर्व चित्रपटांना मागे टाकत रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट 'गली बॉय'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब आपल्या नावे केला आहे. एवढचं नाहीतर यंदाच्या फिल्म फेयर अवॉर्डमध्ये गली बॉय या चित्रपटाला इतरही सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये रणवीर सिंहने सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावे केला तर आलिया भट्टने 'गली बॉय'मधील आपल्या अभिनयासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा बहुमान पटकावला. त्याचसोबत 'आर्टिकल 15' या चित्रपटासाठी आयुष्मान खुरानाला सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून मेल क्रिटिक्स अवॉर्ड देण्यात आला.





चित्रपट 'गली बॉय'ला सर्वोत्कृष्ठ अभिनेता आणि अभिनेत्री व्यतिरिक्त इतरही अनेक कॅटेगरीमध्ये अवॉर्ड्स देण्यात आले. चित्रपट 'गली बॉय'ला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. त्यासोबत झोया अख्तरला सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. तसेच सिद्धांत चतुर्वेदी आणि अमृता सुभाष यांना 'गली बॉय' सहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आलं. 'गली बॉय'साठी रीमा कागती आणि झोया अख्तरला बेस्ट स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला. तसेच यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी 'गली बॉय'ची एन्ट्री झाली होती.





65व्या अॅमेझॉन फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020 दरम्यान 'गली बॉय'ला बेस्ट म्युझिकचा पुरस्कारही मिळाला. तसेच विजय मौर्या यांना 'गली बॉय'साठी बेस्ट डायलॉग कॅटेगरीतील पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर 'अपना टाइम आएगा' या रॅप सॉन्गसाठी डिवाइन आणि अंकुर तिवारी यांना बेस्ट लिरिक्स या पुरस्काराने गौरवण्यात आलं.





65व्या अॅमेझॉन फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020 मध्ये 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' आणि 'पति पत्नी और वो' या चित्रपटांसाठी अनन्या पांडेला बेस्ट डेब्यू फीमेल अॅक्टर म्हणून गौरवण्यात आलं. तसेच अभिमन्यु दासानी याला 'मर्द को डर नहीं लगता' या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू अॅक्टर मेल हा पुरस्कार देण्यात आला. याचसोबत 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटासाठी आदित्य धारला बेस्ट डेब्यू दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.







फिल्मफेयर अलॉर्ड्समध्ये भूमि पेडनेकर आणि तापसी पन्नूला 'सांड की आंख'साठी सर्वश्रेष्ठ अभिनेता फीमेल क्रिटिक्स पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच सर्वश्रेष्ठ चित्रपट (क्रिटिक्स)मध्ये 'सोनचिरिया' आणि 'आर्टिकल 15' ने आपलं नाव कोरलं. चित्रपट 'आर्टिकल 15'साठी अनुभव सिन्हा आणि गौरव सोलंकीला सर्वश्रेष्ठ ओरिजिनल स्टोरी अवॉर्ड देण्यात आला.







याचसोबत आयुष्मान खुरानाला 'आर्टिकल 15'साठी सर्वश्रेष्ठ अभिनेता मेल क्रिटिक्स अवॉर्ड देण्यात आला. चित्रपट 'वॉर'चं गाणं घुंघरूसाठी शिल्पा रावला बेस्ट प्ले बॅक सिंगर फिमेलचा पुरस्कार मिळाला. तसेच चित्रपट 'कलंक'साठी अरजित सिंहला बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल अवॉर्ड देण्यात आला.