![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rakhi Sawant : राखी सावंतचा गर्भपात? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
राखीचा (Rakhi Sawant) गर्भपात झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
![Rakhi Sawant : राखी सावंतचा गर्भपात? सोशल मीडियावर चर्चेला उधाण Viral Bhayani share post about rakhi sawant miscarriage Rakhi Sawant : राखी सावंतचा गर्भपात? सोशल मीडियावर चर्चेला उधाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/1964c1d369eabe73dc74848442c83a3b1674035388584259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राखी वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं मांडते. राखी विविध शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. आता राखीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. राखीचा गर्भपात झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
फोटोग्राफर विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये विरल भयानीनं लिहिलं, 'राखी सावंत ही नेहमीच आपल्याला हसवते. दुर्दैवाने, राखीला सध्या खूप वेदना होत आहेत. तिच्या आईच्या आरोग्याच्या समस्या आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्यांदरम्यान सध्या एक वाईट बातमी समोर येत आहे.
पुढे पोस्टमध्ये लिहिलं आहे, "राखीने मला फोनवर सांगितले की, यश भाऊ, मी प्रेग्नंट होते आणि मी बिग बॉस मराठी शोमध्येही याची घोषणा देखील केली होती. पण सगळ्यांनाच हा विनोद वाटला. त्यामुळे या गोष्टीकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही." तिचा गर्भपात झाल्याची माहिती तिनं दिली आहे या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
राखीचा खरंच गर्भपात झाला आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना या पोस्टमुळे पडत आहे. याबाबत राखीने अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. बिग बॉस-14, नच बलिये, बिग बॉस-15 आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)