Vijay Galani Death : चित्रपट निर्माते विजय गलानी (Vijay Gilani)यांचं बुधवारी (29 डिसेंबर) रात्री निधन झाले. गेली काही महिने ते लंडनमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचार घेत होते. विजय गलानी यांनी 1992 प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात सलमान खान (Salman Khan), अमृता सिंह (Amrita Singh)आणि शीबा (Sheeba)यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
रिपोर्टनुसार, विजय गलानी हे कुटुंबासोबत बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी लंडनमध्ये गेले होते. काही महिन्यांआधी त्यांना ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. विजय गलानी यांनी निर्मीती केलेल्या वीर या चित्रपटाचं दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नुकताच एबीपी न्यूजसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं, 'विजयच्या निधनानं मला खूप दु:ख झालं आहे. तो खूप चांगला होता.'
विद्युत जामवाल आणि अभिनेत्री श्रुती हासन यांची प्रमुख भूमिका असणारा The Power या चित्रपटाची देखील विजय यांनी निर्मीती केली होती. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता.
अक्षय कुमार, बॉबी देओल,करीना कपूर आणि बिपाशा बसु अशी स्टार कास्ट असणाऱ्या अजनबी या चित्रपटाची निर्मीती विजय यांनी केली. होती. हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला. तसेच अचानक आणि द पॉवर यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मीती देखील विजय यांनी केली होती. विजय यांचा मुलगा प्रतिक गलानी 3-4 दिवसाआधीच लंडनमधून भारतात परत आला होता. आता वडीलांच्या निधनाबद्दल कळताच तो पुन्हा लंडनला गेला आहे.
संबंधित बातम्या
Pushpa: The Rise : Allu Arjun च्या 'पुष्पा' सिनेमाच्या यशाने दिग्दर्शक भारावला, प्रत्येक क्रू मेंबरला देणार 1 लाखांचे बक्षीस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha