Liger : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडेचा (Ananya Panday) 'लायगर' सिनेमा येत्या 25 ऑगस्ट 2022 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची पहिली झलक 31 डिसेंबरला प्रेक्षकांना पाहता येणार आहे. टायगर श्रॉफसोबत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अनन्या या सिनेमात साऊथ स्टारसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
करण जोहरनेदेखील ट्विटरवर टीझर शेअर केला आहे. 'लायगर' सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या झलकची तारीख आणि वेळ जाहीर करणारा एक टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओची सुरुवात व्हॉइसओव्हरने होते आणि निर्माते घोषणा करतात, 'विटनेस द मॅडनेस'. 31 डिसेंबर रोजी सकाळी 10:03 वाजता झलक
लोकप्रिय दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनेक रोमांचक पैलू दिसणार आहेत. सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवराकोंडा पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार येणार आहे. निर्मात्यांनी मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.
संबंधित बातम्या
New Year 2022 : यावर्षात OTT वर वेबसीरिजचा धमाका! 'या' बहुप्रतीक्षित वेब सीरिज गाजवणार 2022 वर्ष
Viral Video : भाईजान झाला 'रिक्षावाला', Salman Khan ने पनवेलमध्ये चालवली ऑटो रिक्षा
Pushpa: The Rise : Allu Arjun च्या 'पुष्पा' सिनेमाच्या यशाने दिग्दर्शक भारावला, प्रत्येक क्रू मेंबरला देणार 1 लाखांचे बक्षीस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha