Pushpa Success Party : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) 'पुष्पा: द राइज' (Pushpa:The Rise) सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. अवघ्या काही दिवसांतच सिनेमाने 275 कोटींचा टप्पा पार केला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. सिनेमाला मिळालेल्या यशामुळे सिनेमातील प्रत्येक क्रू मेंबरला 1 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
अल्लू अर्जुनच्या चाहते त्याच्या सिनेमातील स्टाईलपासून ते सिनेमाच्या कथानकापर्यंत सोशल मीडियावर भरभरून कौतुक करत आहेत. 'पुष्पा' सिनेमाला मिळत असलेल्या यशामुळे सिनेमाच्या दिग्दर्शकांनी पडद्यामागच्या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी त्यांना 1 लाखांचे बक्षीस देण्याचे आश्वासन दिले आहे.
'पुष्पा: द राइज' हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरदेखील चांगचाल धमाका केला आहे. 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 50 कोटींची कमाई केली होती.
संबंधित बातम्या
Pushpa Box Office : साऊथ सुपरस्टार Allu Arjun चा बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरही धमाका
Arjun Kapoor Corona Positive : कपूर कुटुंबात कोरोनाचा शिरकाव; अर्जुन, अंशुला आणि रियाला कोरोनाची लागण
Ranveer Singh Movie 83 : 5,10, 15 कोटी नव्हे, रणवीर सिंहला 83 सिनेमासाठी कोटीच्या कोटी, डोळे विस्फारायला लावणारी रक्कम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha