Vijay Deverakonda : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा लायगर (Liger) हा चित्रपट 2022 मधील फ्लॉप चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. अनन्या पांडेचा अभिनय आणि कथानक यांमुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला असं अनेकांचे मत आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या अपयशामुळे चित्रपट निर्माते आणि वितरकांना मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता विजयनं मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, विजय हा त्याच्या मानधनातील सहा कोटी रुपये निर्मात्यांना परत करणार आहे. 


विजय करणार सहा कोटी परत


लायगर चित्ररटामुळे ज्या वितरकांचे नुकसान झाले आहे, त्यांची भेट दिग्दर्शक-निर्माता पुरी जगन्नाथ हे लवकरच घेणार आहेत.विजय देवरकोंडाने त्याच्या मानधनातून सहा कोटी रुपये निर्मात्यांना परत देण्याचा निर्मण घेतल्यानं ही रक्कम पुरी जगन्नाध आणि चार्मे कौर यांना आणि वितरकांना झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी मदत करेल. गेल्या आठवड्यात, वितरक वारंगल श्रीनू यांनी सांगितलं की पुरी जगन्नाध यांनी झालेल्या नुकसानाबाबत चर्चा करण्यासाठी सर्व वितरकांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.


लायगरचं 90 कोटी बजेट!


विजय देवरकोंडानं लायगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 25 ऑगस्ट रोजी लायगर हा चित्रपट रिलीज झाला. पुरी जगन्नाथ, करण जोहर आणि चार्मे कौर यांनी 90 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये लायगर चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्यासोबतच रोनित रॉय, रम्या कृष्णन, मकरंद देशपांडे आणि विश रेड्डी या कलाकारांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर' या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. या चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चर्चेत होता मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. लायगरमधील अनन्याच्या अभिनयाला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: