Brahmastra : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या वाराणसीत या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. वाराणसीतील सिनेमाच्या शूटिंगचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या वाराणसीत त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे शूटिंग करत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 9 सप्टेंबर 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये 'ब्रह्मास्त्र' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्यासोबत नागार्जुन आणि शाहरुख खान यांच्यादेखील विशेष भूमिका आहेत.
संबंधित बातम्या
Oscar 2022 : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा करणार ऑस्करच्या प्री इव्हेंटचे सूत्रसंचालन
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ला मिळणार होता गानकोकीळा लतादीदींचा आवाज, पण..., विवेक अग्निहोत्रीने केला खुलासा
#BoycottRRRinKarnataka : कर्नाटकात ‘आरआरआर’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha