Oscar 2022 : जगभरात ऑक्सर (Oscar) पुरस्कार हा सर्वांत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानलो जातो. लवकरच हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. या वर्षीच्या ऑस्कर वितरण सोहळ्यातलील प्री इव्हेंटचे (Pre Oscar Event) सूत्रसंचालन करण्याचा मान बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) मिळाला आहे.
प्रियंका चोप्रा लवकरच प्री ऑस्कर इव्हेंटमध्ये सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. प्री ऑस्कर इव्हेंट 23 मार्च 2022 रोजी पार पडणार आहे. प्रियांका चोप्रानं हॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे प्रियंकाचे चाहते तिला आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा होणार आहे. तर 28 मार्चला भारतात या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. अमेरिकेतल्या 'अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्स या संस्थेद्वारे दर वर्षी हे पुरस्कार दिले जातात.
संबंधित बातम्या
Kangana Ranaut Birthday Special : कंगनाला 'या' पाच सिनेमांसाठी मिळाले राष्ट्रीय पुरस्कार
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ला मिळणार होता गानकोकीळा लतादीदींचा आवाज, पण..., विवेक अग्निहोत्रीने केला खुलासा
Swatantra Veer Savarkar : स्वातंत्रवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार रणदीप हुडा! महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha