Boycott RRR : दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आरआरआर’ (RRR) अवघ्या दोन दिवसांनंतर म्हणजे 25 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असून, रिलीज होण्यापूर्वीच त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. ट्विटरवर #BoycottRRRinKarnataka ट्रेंड करत आहे. हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित होणार नसल्याने लोक संताप व्यक्त करत आहेत. 


बहुप्रतीक्षित ‘RRR’ हा चित्रपट कन्नड भाषेतही रिलीज करावा, अशी कर्नाटकातील जनतेची मागणी आहे. यासाठी ट्विटरवर या हॅशटॅग बॉयकॉटचा महापूर आला आहे. नाराजी व्यक्त करत चाहते आणि प्रेक्षकांनी RRR चित्रपट कन्नडमध्ये रिलीज करण्याची मागणी केली आहे. काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत, तर काही लोक चित्रपटाच्या टीम आणि कलाकारांना दोष देऊ नका, असे देखील म्हणत आहेत. 


ट्विटरवर #BoycottRRRinKarnatakaचा पूर







कन्नड भाषेत चित्रपट का नाही? 


‘RRR’ या चित्रपटाची कथा ब्रिटिश राजवटीच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आली आहे. ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि रामचरण (Ram Charan) हे अभिनेते दोन भारतीय क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट, श्रिया शरण, अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत. ‘RRR’ हा एक तेलुगु चित्रपट आहे, जो हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतर भारतीय आणि परदेशी भाषांच्या डब केलेल्या व्हर्जनमध्ये रिलीज होणार आहे. तथापि, रिलीजच्या अवघ्या दोन दिवस आधी, त्याच्या कन्नड आवृत्तीबद्दल गोंधळ उडाला आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने देशातील प्रमुख शहरांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha