Chaava : बॉलिवूडच्या सर्वात दमदार अभिनेत्यांमध्ये विकी कौशलचा (Vicky Kaushal) समावेश होतो. विकी कौशल आता 'छावा : द ग्रेट वॉरियर' (Chhava : The Great Warrior) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी त्याने त्याचा संपूर्ण लूक बदलला आहे. कोणतीही भूमिका साकारणं विकीसाठी कठीण नाही. प्रत्येक भूमिका चोख निभावण्यावर त्याचा भर असतो. विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अशातच आता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो लीक झाले आहेत. 'छावा'च्या सेटवरुन विकी कौशलचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा जबरदस्त लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 


विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेता खूप मेहनत घेत आहे. चित्रपटासाठी त्याने आपला संपूर्ण लूक बदलला आहे. 


'छावा'तील विकी कौशलचा लूक लीक! (Vicky Kaushal Chaava Look Leaked)


'छावा' चित्रपटाच्या सेटवरील विकी कौशलचा लूक लीक झाला आहे. लांबलचक केस, दाढी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा अशा विकीच्या जबरदस्त लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दमदार लूकने विकीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. विकीचे व्हायरल होणारे हे फोटो जंगलातील शूटिंगदरम्यानचे आहेत. या चित्रपटासाठी विकी कौशलने घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजी अशा अनेक गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं आहे. 






'छावा'मध्ये काय पाहायला मिळणार? (Chhava Movie Story)


'छावा' हा चित्रपट डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावर आधारित आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानादेखील (Rashmika Mandanna) झळकणार आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी येसुबाई भोसले यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकणार आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 


रश्मिकाने नुकतचं 'छावा'मधील आपलं शूटिंग पूर्ण केलं आहे. एक पोस्ट शेअर करत तिने विकी कौशलचं कौतुक केलं होतं. तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे आभार मानले होते. दिनेश विजान यांच्या मॅडडॉक्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'छावा'सह विकी कौशलचे बॅड न्यूज आणि लव्ह अॅन्ड वॉर हे चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


संबंधित बातम्या


Bad Newz : विकी कौशल आणि 'Animal' फेम तृप्ती डिमरी एकत्र 'बॅड न्यूज' देणार! प्रकरण नेमकं काय?