Bollywood Singer Arijit Singh : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे असंख्य गायक  (Singer) आणि गायिका आहेत. काही गायकांच्या आवाजाची जादू अनुभवण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. पण बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतील एक गायक आपल्या आवाजाने सर्वांनाच थक्क करत असतो. प्रत्येक संगीतप्रेमीला त्याने आपल्या आवाजाने वेड लावलं आहे. संपूर्ण जग त्याच्यावर फिदा आहे. तासाभरासाठी सादरीकरण करण्यासाठी गायक कोट्यवधी रुपये आकारतो. एका गाण्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या गायकाला खऱ्या आयुष्यात मात्र साधं राहायला आवडतं. त्याचं साधं राहणीमान चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतं. चप्पल परिधान केलेला, हातात झोळी घेऊन फिरणाऱ्या या गायकाला तुम्ही कधीही आणि कुठेही पाहू शकता.

  


कोट्यवधींचा मालक असणारा हा गायक कोण? (Arijit Singh Lifestyle) 


कोट्यवधींचा मालक असणारा हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून अरिजीत सिंह (Arijit Singh) आहे. अरिजीत सिंहचा समावेश बॉलिवूडच्या टॉप गायकांच्या यादीत होतो. त्याचं प्रत्येक गाणं सुपरहिट होत असंत. चाहते नेहमीच त्याच्या आवाजाची प्रतीक्षा करत असतात. चाहते त्याला 'किंग ऑफ प्लेबॅग सिंगिंग' असं म्हणतात. 






अरिजीत सिंह किती मानधन घेतो? (Arijit Singh Fees Networth)


अरिजीत सिंहने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. अरिजीत सिंह एका गाण्याचे 8 ते 10 कोटी रुपये चार्ज करतो. तर लाईव्ह कॉन्सर्टसाठी तो 1.5 कोटी रुपये चार्ज करतो. बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांमध्ये अरिजीतचा समावेश होतो. मीडिया रिपोर्टनुसार, अरिजीतची एकूण संपत्ती 57 कोटींच्या आसपास आहे. मुंबईत त्याचं आलीशान घर आहे. देशासह परदेशातदेखील तो लाईव्ह कॉन्सर्ट करतो. या लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून तो चांगलीच कमाई करतो. अरिजीत दर महिन्याला 50 लाख रुपयांपेक्षा अधिक कमाई करतो. चित्रपटात एक गाणं गाण्याचे तो 30 लाख रुपये आकारतो. 


अरिजीत सिंहने केलेत दोन लग्न (Arijit Singh Wedding)


बॉलिवूडचा लोकप्रिय गायक असणारा अरिजीत सिंह दोनवेळा लग्नबंधनात अडकला आहे. रुपरेखा बॅनर्जीसोबत त्याचं पहिलं लग्न झालं होतं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. रुपरेखापासून विभक्त झाल्यानंतर अरिजीत कोयल रॉयला डेट करत होता. पुढे तिच्यासोबतच त्याने दुसरं लग्न केलं. अरिजीतला तीन मुलं आहे. 


अरिजीत सिंह पूर्वी आपल्या कुटुंबासोबत कोलकातामध्ये राहत असे. पण आता आपल्या कुटुंबियांसोबत तो नवी मुंबईत राहतो. नवी मुंबईत त्याचा एक बंगला आहे. या आलिशान बंगल्याची किंमत 8 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अरिजीतकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अरिजीतकडे रेंज रोवर, हमर आणि मर्सिडिज बँजसारख्या आलिशान गाड्या आहेत.


संबंधित बातम्या


Pune Arijit Singh Concert : गायक अरिजित सिंह पुण्यातील कॉन्सर्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत, 'या' कारणामुळे कॉन्सर्ट पुढे ढकलला!