Moushumi Chatterjee Personal Life : अभिनेत्री मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee) हिने बंगाली आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. 70-80 च्या दशकात तिने एकापेक्षाएक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वयाच्या 10 व्या वर्षी मौसमीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे अभिनेत्री अनेकदा चर्चेत आली आहे. मौसमी चटर्जी म्युझिक दिग्दर्शक आणि गायक हेमंत कुमार यांचा मुलगा जयंत मुखर्जीसोबत लग्नबंधनात अडकली होती. मौसमी 10 वीत असताना वयाच्या 15 व्या वर्षी तिचं लग्न झालं होतं. अनेक चित्रपटांमधून तिला रिप्लेस करण्यात आलं होतं.
लहरेंला दिलेल्या मुलाखतीत मौसमीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. मौसमी म्हणाली,"मी दहावीत असताना हेमंत कुमार यांच्यासोबत आपलं खूप चांगलं कौटुंबिक रिलेशन निर्माण झालं होतं. माझा बालविवाह व्हावा अशी लोकांची इच्छा होती. मी दहावीत असताना माझे सासरे हेमंत कुमार यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की मौसमी आमची सून आहे. त्यानंतर लगेचच माझा साखरपुडा पार पडला होता".
वयाच्या 17 व्या वर्षी आई झाली मौसमी
मौसमी पुढे म्हणाली,"माझ्या मोठ्या आत्याला कर्करोगाचं निदान झालं होतं. तिला आमचं लग्न पाहण्याची इच्छा होती. त्यामुळे मी एप्रिल महिन्यात 10 वीची परिक्षा पार पडल्यानंतर लगेचच मार्च महिन्यात लग्नबंधनात अडकले. पुढे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मला माझ्या सासरकडून प्रोत्साहन मिळत होतं. पण मी शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला. पुढे वयाच्या 17 व्या वर्षी मी आई झाले. त्याचदरम्यान मला एक चित्रपट मिळाला. माझ्याकडे मर्सिडीज होती. त्यावेळी यशाची व्याख्या मला कळलेली नव्हती. स्वत:ला रुपेरी पडद्यावर पाहूनच मला आनंद मिळत असे".
मौसमीला करिअरच्या सुरुवातीलाच लोकप्रियता मिळाली. पण एटीट्यूडमुळे अनेक चित्रपटांमधून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मुलाखतीत मौसमी म्हणाली,"मी 'देश प्रेमी' आणि 'बरसात की एक रात' हे दोन चित्रपट साइन केले होते. पण मला रिप्लेस करण्यात आलं. कॉम्प्रोमाइज करुन पुढे जायला मी कधीच तयार नव्हते".
'असा' आहे मौसमीचा सिनेप्रवास (Moushumi Chatterjee Movies)
मौसमी चटर्जीने 1967 मध्ये 'बालिका वधू' या चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. अनुराग हा त्याचा पहिला चित्रपट होता. अभिनेत्रीने नैना, कच्चे घागे, जहरीला इंसान, बेनाम, बदला, नाटक, दो झूठ, अनाडी, अब क्या होगा, हत्यारा, दिल और दीवार, भोला भाला, दो लडके दोनो कडके, पीकू, हम कौन है?, आ अब लौट चले, डोली सजा कर रखना यांसारख्या चित्रपटांत मौसमीने काम केलं आहे.
बंगाली आणि हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून मौसमीने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. 70-80 च्या दशकात तिला बोलबाला होता. वयाच्या 10 व्या वर्षी तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
संबंधित बातम्या