एक्स्प्लोर

Vashu Bhagnani : अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...

Vashu Bhagnani : काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटाचा फटका बसल्याने निर्माते वासू भगनानी यांनी आपले कर्ज फेडण्यासाठी ऑफिसची इमारत विकली असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर आता वासू भगनानी यांनी मौन सोडले आहे.

Vashu Bhagnani : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या चित्रपटांची सध्या वाईट स्थिती आहे. अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चमकदार कामगिरी करत नाही. याचा फटका निर्मात्यांना बसत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटाचा फटका बसल्याने निर्माते वासू भगनानी (Vashu Bhagnani) यांनी आपले कर्ज फेडण्यासाठी ऑफिसची इमारत विकली असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर आता वासू भगनानी यांनी मौन सोडले आहे. आपण ऑफिसची इमारत विकली नसून त्याचा पुनर्विकास होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना वासू भगनानी यांनी या अफवेवर मौन सोडले. कर्जबाजारी झाल्याने काहींचे पैसे देखील थकले असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर बोलताना वासू भगनानी यांनी म्हटले की, 'मी गेल्या 30 वर्षांपासून या व्यवसायात आहे. मी पैसे दिले नसल्याचा दावा करणारे काही लोक असतील तर त्यांनी पुढे येऊन आमच्याशी चर्चा करावी. पूजा एंटरटेनमेंटसोबत त्यांचा करार झाला होता का, त्यांच्याकडे आमची काही थकबाकी असेल तर त्यांनी काही तक्रार दाखल केली का? असा उलट प्रश्न करत काही गोष्टी दुरुस्त करण्याचे अनेक मार्ग आहेत असेही त्यांनी म्हटले. 

काही तक्रार असेल माझ्या कार्यालयात येऊन बोला...

वासू भगनानी यांनी पुढे म्हटले की, 'जर कोणाला काही अडचण वाटत असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं, माझ्या ऑफिसमध्ये यावे असेही त्यांनी म्हटले. तुमचे काही पैसे अडकले असतील तर आम्हाला करार आणि इतर संबंधित कागदपत्रे द्या आणि काही गोष्टी ठीक करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी द्या असे आवाहन वासू भगनानी यांनी केले. आम्ही सध्या ब्रिटनमधील एका प्रोडक्शन कंपनीसोबत काम करत आहोत. जर कोणाची थकबाकी असेल तर त्यांनी आमच्याशी थेट संपर्क साधावा असेही त्यांनी म्हटले. 

पूजा एंटरटेन्मेंटचे ऑफिस विकलं नाही...

कर्जाच्या डोंगरामुळे पूजा एंटरटेन्मेंटचे ऑफिस विकलं गेल्याच्या चर्चेवरही वासू भगनानी यांनी मौन सोडले. त्यांनी सांगितले की, ऑफिसच्या जागेचा पुनर्विकास केला जात आहे. त्याचे नियोजन वर्षभरापूर्वी करण्यात आले होते. आता 'बडे मियाँ छोटे मियाँ' रिलीज झाल्यानंतर पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झाली आहे. 

वासू भगनानी यांनी म्हटले की, हिट आणि फ्लॉप चित्रपट  हा व्यवसायाचा एक भाग आहेत. आम्ही आधीपासून एका प्रोजेक्टवर काम करत आहोत. हा प्रोजेक्ट एक भव्य अॅनिमेशन सीरिज असल्याची माहिती भगनानी यांनी दिली.  वासू भगनानी हे रितेश देशमुखचा भाऊ धीरज देशमुख याचे सासरे आहे. वासू भगनानी यांची कन्या आणि जॅकी भगनानी यांची बहीण पूजा हिचा विवाह धीरजसोबत झाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Water Issue Special Report : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लकPune Tanker Accident : अल्पवयीन मुलानं टँकर चालवत चौघांना उडवलं, पुण्यात चाललंय काय?TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Horoscope Today 29 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
Embed widget