Varun Dhawan : आपल्याला 'हे' का कळत नाही; 'पठाण'च्या यशाबद्दल वरुण धवनची बायकॉट बॉलिवूडवर प्रतिक्रिया
Varun Dhawan On Pathaan : अभिनेता वरुण धवनने शाहरुखच्या 'पठाण' सिनेमाचं कौतुक करत बायकॉट बॉलिवूडवरदेखील भाष्य केलं आहे.
Varun Dhawan On Boycott Bollywood : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतो. वरुणने नुकतचं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमाच्या यशाबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. दरम्यान त्याने बायकॉट बॉलिवूडवरदेखील (Boycott Bollywood) आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वरुण धवन मंगळवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला,"बायकॉट ट्रेंडकडे दुर्लक्ष करायला हवे. 'पठाण'च्या यशाने हे सिद्ध झालं आहे की, प्रेक्षकांना जे आवडतं ते त्यांना दिलं तर ते आवडीने त्या गोष्टीचा स्वीकार करतात. प्रेक्षकांना नव-नवीन गोष्टी पाहायला आवडतात. 'पठाण'मध्ये प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांनी मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. त्यामुळे ते या सिनेमाला पसंती दर्शवत आहेत. बॉलिवूडकरांसाठी हा नक्कीच आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे बॉयकॉट ट्रेंडकडे दुर्लक्ष करावे".
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सिनेमावर बहिष्कार टाकण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात या सिनेमावर टीका होत होती. पण सिनेमा रिलीज झाला आणि शाहरुखच्या चाहत्यांनी तसेच सिनेप्रेमींनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं. चाहत्यांच्या शाहरुखवरच्या प्रेमाने 'बॉयकॉट बॉलिवूड' हा ट्रेंड आपोआप बंद झाला.
View this post on Instagram
बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला
जगभरात शाहरुख खानच्या 'पठाण'ची चांगलीच क्रेझ आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा बोलबाला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर जगभरात आतापर्यंत या सिनेमाने 600 कोटींपेक्षा अधिक कमाई करत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. लवकरच हा सिनेमा 1000 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तर भारतात हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. 'पठाण' या सिनेमाची सध्या जगभरात चर्चा आहे. शाहरुखचे चाहते या सिनेमाचं आणि लाडक्या सेलिब्रिटीच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक करत आहेत. हजारो रुपये खर्च करत ते सिनेमागृहात जाऊन 'पठाण' सिनेमा पाहत आहे. 'पठाण' सिनेमाची लोकप्रियता पाहता लवकरच 'पठाण 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या