Uunchai Trailer : मैत्रीवर भाष्य करणाऱ्या 'ऊंचाई'चा ट्रेलर रिलीज; अमिताभ-परिणीती मुख्य भूमिकेत
Uunchai : 'ऊंचाई' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Uunchai Movie Trailer : बहुचर्चित 'ऊंचाई' (Uunchai) सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अनुपम खेर (Anupam Kher) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) मुख्य भूमिकेत आहेत. 'ऊंचाई' हा सिनेमा मैत्रीवर भाष्य करणारा आहे.
'ऊंचाई' सिनेमात परिणीती चोप्रा टूरिस्ट गाइडच्या भूमिकेत दिसणार असल्याचा ट्रेलरवरुन अंदाज येतो. तसेच अमिताभपासून बोमन पर्यंत अनेक कलाकारांच्या अभिनयाची जादू ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या सिनेमाचा ट्रेलर खूपच कमाल आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'ऊंचाई' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी आणि डॅनी डेंगजोप्माच्या मैत्रीची जादू पाहायला मिळत आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तीन मित्रांच्या मैत्रीवर आधारित 'ऊंचाई' हा सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी या सिनेमाचं पोस्टरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.
View this post on Instagram
'ऊंचाई' नोव्हेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'ऊंचाई' सिनेमाचं दिग्दर्शन सूरज बडजात्याने केलं आहे. तर या मल्टीस्टारर सिनेमात अमिताभ बच्चन आणि परिणीती चोप्रा व्यतिरिक्त अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राजश्री प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती करणाऱ्या राजश्री प्रोडक्शन हाऊसचा 'ऊंचाई' हा 75 वा सिनेमा आहे. 11 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या