एक्स्प्लोर
'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील 'या' बॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू
'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील बॉलिवूड अभिनेते नवतेज हुंडाल यांचं निधन झालं. हुंडाल यांनी या चित्रपटात गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती.
!['उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील 'या' बॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू 'Uri The Surgical Strike' fame bollywood actor Navtej Hundal passes away 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील 'या' बॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/10110710/Actor-Navtej-Hundal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील बॉलिवूड अभिनेते नवतेज हुंडाल यांचं निधन झालं. हुंडाल यांनी या चित्रपटात गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती.
'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन' (सिंटा)च्या ट्विटर हँडलवरुन हुंडाल यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी सांगण्यात आली आहे. जोगेश्वरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली.
नवतेज हुंडाल यांच्या पश्चात पत्नी नीलम आणि दोन मुली आहेत. त्यांची कन्या अवंतिका हुंडाल ही 'ये है मोहब्बते' या प्रसिद्धी टीव्ही मालिकेत मिहिकाची व्यक्तिरेखा साकारत आहे. VIDEO | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर : अभिनेता विकी कौशल पाथ ब्रेकिंग पुरस्कार | मुंबई नवतेज हुंडाल यांनी अभिनय प्रशिक्षण शिबीरंही घेतली आहेत. संजय दत्तसोबतचा 'खलनायक' (1993), 'तेरे मेरे सपने' (1996) यासारख्या चित्रपटांसोबत 'भारत एक खोज' या टीव्ही शोमध्ये ते झळकले होते.#CINTAA expresses it’s deepest condolence on the demise of Shri Navtej Hundal. May his soul Rest in Peace The cremation is at Oshiwara Crematorium, Relief Rd, Prakash Nagar, Dnyaneshwar Nagar, Jogeshwari (W) at 11 am.@sushant_says @amitbehl1 @SuneelSinha @ayubnasirkhan pic.twitter.com/00kmfEUrML
— CINTAA_Official (@CintaaOfficial) April 8, 2019
View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)