Kusha Kapila-Uorfi Javed : लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने (Kusha Kapila) काही दिवस सोशल मीडियापासून (Social Media) ब्रेक घेतला होता. आता या मोठ्या ब्रेकनंतर तिने जोगदार कमबॅक केले आहे. या कमबॅकनंतर कुशा कपिला 'स्वाईप राईड' चा तिसरा सीजन ती घेऊन आली आहे. या एपिसोडच्या एक दिवसापूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर या संबंधित पोस्ट शेअर केली होती. ज्याखाली कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, "या माझ्या गाडीत बसा. तुमच्या मित्र-मैत्रिणीला टिंडर डेटवर घेऊन जायचे आहे, आम्ही घेऊन जाऊ." कुशाने 'स्वाईप राईड' चा नविन एपिसोड माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) सोबत शूट केला आहे. ज्यात कुशाने तिला अनेक मजेशीर प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांवर उर्फीने फारच इंटरेस्टिंग उत्तर दिले आहेत.
संबंधित व्हिडीओमध्ये (Video) सुरुवातीस कुशाने उर्फीला विचारले आहे, "तुला एक मुलगा आवडला आणि त्याला तू प्रपोज केलेस मात्र त्याने तुला नकार दिला तर तू त्यातुन बाहेर येण्यासाठी काय करशील?" त्यावर उर्फीने लगेच उत्तर दिले आहे, "यावर माझ्याकडे एकच उपाय आहे, मी म्हणेन खड्ड्यात जा..." यानंतर परत कुशाने तिला विचारले की, "एखादा अनोळखी मुलाने जर बाॅडी शेमिंग केले तर ते तू कशा प्रकारे हाताळते?" त्यावर उर्फी म्हणाली, "मी आता तिकडे फार लक्ष देत नाही." पुढे ती म्हणाली, "तुम्हाला कोणाकडून तरी नकार मिळणं , ब्रेकअप होणं या सर्व गोष्टी तुमच्यासोबत झाल्या तरच तुम्हाला कळेल की, तुम्हाला आयुष्यात नेमके काय हवे आहे." 'स्वाईप राईड' हा एक असा शो आहे ज्यात कुशा सेलेब्रिटींना बोलावते आणि ती त्यांच्यासोबत डेटींग टिप्स विषयी चर्चा करते. 'स्वाईप राईड' चा सीजन 3 Jio Cinema वर फ्रीमध्ये तुम्ही पाहू शकता.
कुशा आणि जोरावर यांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची दिली होती माहिती
कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना घटस्फोट घेत असल्याचे सांगितले होते. तिने लिहिले होते, "जोरावर (Zorawar Singh Ahluwalia) आणि मी परस्पर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी हा निर्णय खरचं सोपा नव्हता. पण आयुष्यातील या टप्प्यावर आम्ही योग्य निर्णय घेतला आहे".
कुशाने पुढे लिहिलं होते, "नातेसंबंधनाचा शेवट हा खूप दुख:द असतो. आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबियांसाठी हे खरचं खूप कठीण होतं. आता यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळाला आहे. परंतू आम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार केला आहे. आता आयुष्याचा पुढचा टप्पा पार करण्याकरता आम्हाला थोडा वेळ लागेल. आम्ही एकमेकांचा नक्कीच आदर करतो आणि एकमेकांना कायम सपोर्ट करत राहू"
इतर महत्वाच्या बातम्या