Vivek Agnihotri : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित पोस्ट शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकताच विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर अभिनेत्री ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai Bachchan) कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील एक फोटो शेअर केला. या फोटोला विवेक अग्निहोत्री यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटला उर्फी जावेदनं (Urfi Javed) रिप्लाय दिला आहे.
विवेक अग्निहोत्री यांचे ट्वीट
विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ऐश्वर्या रायचा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एक व्यक्ती हा ऐश्वर्याचा ड्रेस निट करताना दिसत आहे. या फोटोला विवेक अग्निहोत्री यांनी कॅप्शन दिलं, 'तुम्ही लोकांनी 'कॉस्च्युम स्लेव्हज' नावाच्या टर्मबद्दल ऐकलं आहे का? त्या बहुतेक मुली असतात (या प्रकरणात एक मुलगा आहे). तुम्ही त्यांना आता भारतातही जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटीसोबत पाहू शकता. केवळ अशा Uncomfortable फॅशनसाठी आपण इतके मूर्ख का बनत आहोत?' विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
उर्फीनं विचारला प्रश्न
विवेक अग्निहोत्रींच्या ट्वीटला उर्फीनं (Urfi Javed) रिप्लाय दिला आहे. तिनं रिप्लाय दिला, 'मला हे जाणून घ्यायचं आहे की, तुम्ही कोणत्या फॅशन स्कूलमधून डिग्री घेतली आहे? तुम्हाला पाहून असं वाटतं की तुम्हाला फॅशनची खूपच जाण आहे. तुम्ही एखादा फॅशन या चित्रपटाचं दिग्दर्शक करायला हवे होते.' उर्फीच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: