Neetu Kapoor Birthday Celebration:  अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा आज  65 वा वाढदविस आहे. अनेक जण त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. नीतू कपूर  यांनी त्यांच्या कुटुंबासोबत इटलीमध्ये वाढदिवस साजरा केला आहे. नीतू कपूर यांनी त्यांच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या इटलीमधील बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. त्यांना या फोटोला कॅप्शन दिलं, 'खूप सुंदर दिवस. मी आलिया  आणि राहा यांना खूप मिस केलं.' नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर हे दिसत आहेत.  नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोला आलियानं 'लव्ह यू' अशी कमेंट केली.






आलियानं सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट


आलियानं नीतू कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. तिनं नीतू सिंह यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  'वाढदिवसाच्या शुभेच्छा क्विन. तुम्ही सर्वकाही चांगलं करता. लव्ह यू'


नीतू कपूर यांचे चित्रपट


नीतू कपूर यांच्या 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या जुग जुग जियो या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात नीतू कपूर यांच्या सोबतच कियारा आडवाणी, वरुण धवन आणि अनिल कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली. ‘यादों की बारात’, ‘हम किसीसे काम नही’, ‘खेल खेल में’ यांसारख्या हिट चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं, ऋषी कपूर आणि नीतू यांनी 10 पेक्षा अधिक चित्रपट हिट दिले. चित्रपटामधील दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  


 नीतू कपूर या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत असतात. सोशल मीडियावर देखील नीतू कपूर अॅक्टिव्ह असतात. त्या कुटुंबासोबतचे फोटो तसेच विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी घेतली मर्सिडीज; आलिशान गाडीची किंमत ऐकून व्हाल अवाक्!