Achani Ravi Passes Away: मल्याळम सिने निर्माते (Malayalam Produce ) आणि उद्योगपती (Businessman) अचानी रवी (Achani Ravi) यांचे आज (8 जुलै) निधन झाले. रवी यांचे पूर्ण नाव रवींद्रनाथन नायर होते. अचानी रवी यांनी 90 व्या वर्षी कोल्लम (Kollam), केरळ (Kerala) येथे अखेरचा श्वास घेतला. रवी यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 'अन्वेशिचू कंदेठीला' या सिनेमातून केली होती. रवी यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली.


 अचानी रवी यांनी  निर्माता म्हणून मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि जनरल पिक्चर्स नावाच्या कंपनीची स्थापना केली. त्यांच्या जनरल पिक्चर्स या कंपनीनं अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली.  अचानी रवी यांचा 1973 मध्ये रिलीज झालेला अचनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्यानंतर त्यांना अचनी रवी हे टोपणनाव मिळाले. चित्रपटांच्या यशानंतर त्यांनी कोल्लम येथे सार्वजनिक वाचनालय बांधले.


अचानी रवी यांनी या चित्रपटांची केली निर्मिती 


 कांचना सीता, थंपू, कुम्मट्टी, एस्तप्पन, पोक्कुवेइल, एलीप्पथायम, मंजू, मुखमुखम, अनंतराम आणि विधेयान या  चित्रपटांची  निर्मिती अचानी रवी (Achani Ravi) यांनी केली. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या आर्ट हाऊस चित्रपटांची निर्मिती आणि वितरण आचानी रवी यांनी केले.


अचनी रवी यांचा 'थंपू' हा चित्रपट नुकताच 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट दिवंगत चित्रपट निर्माते जी. अरविंदन यांनी दिग्दर्शित केला होता.






अचनी रवी यांना त्यांच्या चित्रपटांसाठी 20 हून अधिक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मल्याळम चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना  2008 मध्ये जेसी डॅनियल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.


अचानी रवी यांचा जन्म कोल्लममधील एका  उद्योगपती कुटुंबात झाला. त्यांनी आपल्या वडिलांचा काजूचा व्यवसाय सांभाळला. त्यांचा  विजयलक्ष्मी काजू हा केरळमधील उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचा काजू उद्योग म्हणून ओळखला जातो.  अचानी रवी यांच्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Korean singer Lee Sang Eun : लोकप्रिय गायिका ली संग युन यांचं निधन; परफॉर्मन्सआधी वॉशरुममध्ये सापडला मृतदेह