Laal Singh Chadda : 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chadda) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. निर्माते सिनेमा संबंधित सर्व गुपिते एक-एक करून उघड करत आहेत. आता निर्मात्यांनी 'तूर कलेयां' (Tur Kalleyan) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 


'तूर कलेयां' हे गाणं केवळ सिनेमातील सर्वात सुंदर दृश्यांपैकी एक नसून 'लाल सिंह चड्ढा'च्या परिवर्तनीय प्रवासावर प्रकाश टाकतो, जो शेवटी जीवनातील सर्व अडचणींना न जुमानता स्वतःवर प्रेम करायला शिकतो. अरिजित सिंह, शादाब फरीदी आणि अल्तमाश फरीदी यांनी गायलेले, प्रीतम यांनी संगीत दिलेले आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. या मोटिव्हेशनल गाण्याला देशभरातून प्रेम आणि दाद मिळाली आहे.






11 ऑगस्टला सिनेमा होणार रिलीज


बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आमिर खान आणि करीना कपूर याआधी '3 इडियट्स' या सिनेमात एकत्र दिसले होते. आमिर आणि करीनाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही जोडी पाहायला मिळणार आहे. चाहते या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसणार आहेत. 


रिलीज डेट खास


आमिर खानने सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख खूप विचारपूर्वक निवडली आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 11 ऑगस्ट दरम्यान सलग सुट्ट्या असल्यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी होणार आहे. तसेच सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचा बोर्डदेखील झळकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


संबंधित बातम्या


Laal Singh Chaddha OTT Release : आमिर-करीनाचा 'लाल सिंह चड्ढा' ओटीटीवर होणार रिलीज; 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक


Laal Singh Chaddha : चित्रपटासाठी वाटेल ते... दुखापतग्रस्त असतानाही आमिर खानने पूर्ण केले होते ‘लाल सिंह चड्ढा’चे चित्रीकरण!