Movies Releasing On 15 August : भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला अनेक सिनेमे सिनेमागृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. यात आमिर खानच्या (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा'पासून (Laal singh Chaddha) अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'रक्षाबंधन'पर्यंत (Raksha Bandhan) अनेक सिनेमांचा समावेश आहे. 


लाल सिंह चड्ढा (Laal singh Chaddha) : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा बहुचर्चित 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक 15 ऑगस्टला सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहू शकतात. 


रक्षाबंधन (Raksha Bandhan) : 'रक्षाबंधन' सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षाबंधन' सिनेमाची टक्कर होणार आहे. 


यशोदा (Yashoda) : 'यशोदा' या सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अनेक वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. समंथाचा आगामी 'यशोदा' सिनेमा 12 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


डे शिफ्ट (Day Shift) : 'डे शिफ्ट' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 12 ऑगस्टपासून प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा इंग्रजी सिनेमा आहे.  


दोबारा (Dobara) : 'दोबारा' सिनेमात प्रेक्षकांना तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 19 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


कोबरा (Cobra) : दाक्षिणात्य अभिनेता विक्रमचा बहुचर्चित 'कोबरा' (Cobra) सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विक्रमसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी आणि इरफान पठाणदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


संबंधित बातम्या


Pushpa 2 : बजेट, रिलीज डेट अन् कास्टिंग; जाणून घ्या पुष्पा-2 बद्दल सर्वकाही


Pathaan Poster : प्रतीक्षा संपली; 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लुक आऊट