Ranveer Singh Police Complaint : बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. त्याच्या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. त्याच्या फोटोशूटचे काहींनी कौतुक केलं तर काहींनी टीका केली. आता न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केल्याने तसेच महिलांच्या भावना दुखावल्याने एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. "भारत हा संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला 'नायक' असे म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकाराला फॉलो करत असतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये, असे रणवीर विरुद्ध गुन्हा दाखल केलेल्या स्वयंसेवी संस्थेचे मत आहे.
स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात कलम 67 A, कमल 292, 293, 354 आणि 509 नुसार भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता रणवीरला अटक होणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
अभिनेता रणवीर सिंहने एका मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये रणवीर कपड्याविना टर्किश गालीच्यावर विविध पोज देताना दिसला. त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या. या पोज जो बर्ट रेनॉल्ड्सच्या कवरपासून प्रेरित आहेत. हे फोटो रणवीरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या