एक्स्प्लोर
'मोहेंजोदडो'चं ट्रेलर लाँच, हृतिक रोशनचा अनोखा अवतार

नवी दिल्लीः हृतिक रोशनचा मच अवेटेड 'मोहेंजोदडो' सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता हृतिक रोशनचा कधीही न पाहिलेला अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधून हृतिक रोशनने केलेला अभिनय प्रेक्षकांना सरप्राईज असणार आहे. जोधा अकबर सिनेमानंतर हृतिकचा हा अनोखा अंदाज प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सिनेमात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे, तर पुजा हेगडे अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केलं आहे, तर निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर हे आहेत. हा सिनेमा येत्या 12 ऑगस्ट रोजी रिलिज होत आहे.
पाहा ट्रेलरः
आणखी वाचा























