Top 5 Indian Thriller-Mystery Films on OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ओटीटीवरील हे चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. ओटीटीवरील विनोदी, रोमँटिक, अॅक्शन या जॉनरचे चित्रपट पाहून तुम्हाला कंटाळ आलाय. काहीतरी वेगळं पाहण्याची इच्छा आहे. मग बॉलिवूडचे 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा. हे चित्रपट पाहण्यात तुम्ही गुंतुन जाल. तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. 


1.) मद्रास कॅफे : शूजित सिरकर दिग्दर्शिक मद्रास कॅफे हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॉन अब्राहम, राशी खन्ना, नर्गिस फाखरी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. विक्रम नामक एका ऑफिसरवर आधारित या चित्रपटाचं कथानक होतं. 'मद्रास कॅफे' हा चित्रपट प्रेक्षकांना युट्यूब, नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर पाहता येईल. 


2.) हसीन दिलरुबा : हसीन दिलरुबा एक थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट आहे. 2021 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विनिल मैथ्यू दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल. विनिल मैथ्यू, तापसी पन्नू आणि हर्षवर्धन राने या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे.


3.) द ताश्केंत फाइल्स : द ताश्केंत फाइल्स हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. विवेक अग्निहोत्रीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना झी 5 वर पाहता येईल.


4.) इतेफाक : सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत 'इतेफाक' हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन अभय चोप्राने केलं होतं. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.


5.) स्पेशल 26 : नीरज पांडे दिग्दर्शित 'स्पेशल 26' हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. युट्यूबवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. 


 मे (May) महिन्यात अनेक धमाकेदार चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. मे महिन्यात 'IPL 2024' आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम होती. पण तरीही ओटीटीवरील कलाकृती पाहायला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. 'आयपीएल 2024' नंतरही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जून महिन्यात प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, झी 5 अशा वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिजची बरसात होणार आहे. प्रत्येक आठवड्यात प्रेक्षकांना काहीतरी नवं पाहता येणार आहे.


संबंधित बातम्या


June OTT Release : जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेब सीरिजचा वर्षाव; तुम्ही काय पाहणार?