Nargis Dutt Birthday :  आपल्या अभिनयाने आणि सुंदरतेने सिनेसृष्टीवर तसेच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नर्गिस (Nargis Dutt) यांचा आज वाढदिवस आहे. नर्गिस यांनी बालकलाकार म्हणून तलाश-ए-इश्क या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर  तमन्ना या सिनेमातून त्यांच्या अभिनेत्रीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.. तेव्हापासून ते 1960 च्या दशकापर्यंत  वीस वर्षांच्या कारकिर्दीत यांनी अनेक सिनेमातून काम केलं. त्यानंतर नरगीस यांनी आपल्या मदर इंडिया चित्रपटातील सहकलाकार सुनील दत्त यांच्याशी लग्न केले. नर्गिस यांच्या वाढदिवसानिमित्त संजयने (Sanjay Dutt) त्याच्या आईसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. 

मदर इंडिया या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी नर्गिस यांना  फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा देखील पुरस्कार मिळाला होता. पण सुनील दत्त यांच्याशी लग्न करुन नर्गिस यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. दरम्यान संजय दत्तने देखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आपलं नाव कमावलं. संजय दत्तचाही आयुष्यातला एक काळ फार कठिण होता. त्याच काळात नर्गिस यांच्या जाण्याने त्याला मोठा धक्का बसला. 

संजय दत्तची आईसाठी खास पोस्ट

संजयने त्याच्या इन्स्टाग्रामवर आईसोबतचे जुने फोटो शेअर केले आहेत.या पोस्टमध्ये त्याने म्हटलं की, हॅप्पी बर्थडे आई. प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला प्रत्येक दिवसाला तुझी आठवण येत असते. आज तू हवी माझ्यासोबत हवी होतीस. तुला जसं हवं होतं तसं आयुष्य मी जगतोय आणि मला आशा आहे की, तुला अभिमान वाटेल असं कामही मी करतोय. खूप प्रेम आई.  

नर्गिस दत्त यांच्या निधनाला आता 43 वर्ष झाली आहेत. आपल्या तीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आग, मदर इंडिया, आवारा, बरसात, श्री ४२० आणि चोरी चोरी यांसह अनेक यशस्वी चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यांतील अनेक चित्रपटात राज कपूर यांच्याबरोबर त्यांनी काम केले. नर्गिस यांनी वयाच्या 51 व्या वर्षी 3 मे 1981 रोजी जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या अभिनयामुळे नर्गिस या कायमच प्रेक्षकांच्या मनामध्ये राहिल्या आहेत.  

ही बातमी वाचा : 

Ajay Purkar : गरजवंत मराठ्यांचा लढा! अजय पुरकर साकारणार माथाडी कामगार नेते 'अण्णासाहेब पाटलां'ची भूमिका