June OTT Release : मे (May) महिन्यात अनेक धमाकेदार चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. मे महिन्यात 'IPL 2024' आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम होती. पण तरीही ओटीटीवरील कलाकृती पाहायला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. 'आयपीएल 2024' नंतरही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जून महिन्यात प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, झी 5 अशा वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिजची बरसात होणार आहे. प्रत्येक आठवड्यात प्रेक्षकांना काहीतरी नवं पाहता येणार आहे. जाणून घ्या जून महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल...


स्टार वार्स:द एकोलाइट (Star Wars The Acolyte)
कधी रिलीज होणार? 4 जून
कुठे रिलीज होणार? डिज्नी प्लस हॉटस्टार


'स्टार वार्स: द एकोलाइट' 2024 मधील बहुप्रतिक्षित वेबसीरिजपैकी एक आहे. फर्स्ट लूक समोर आल्यापासून चाहते या सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. ही अॅक्शन सीरिज आहे. या सीरिजमध्ये मांडला स्टेनबर्ग, ली जंग, मैनी मैसिंटो, डैफने कीनसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 4 जून 2024 रोजी ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


द लीजेंड ऑफ हनुमान 4 (The Legend of Hanuman 4) 
कधी रिलीज होणार? 5 जून 2024
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार


'द लीजेंड ऑफ हनुमान 4' ही भारतातील सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड सीरिजपैकी एक आहे. हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर या सीरिजचा ट्रेलर आऊट करण्यात आला होता. 5 जून 2024 रोजी ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. शरद केळकर आणि दमन सिंह या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


हिटलर अॅन्ड द नाजिस-इविल ऑन ट्रायल (Hitler and The Nazis-Evil on Trial)
कधी रिलीज होणार? 5 जून 2024
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


'हिटलर अॅन्ड द नाजिस-इविल ऑन ट्रायल' ही सीरिज 5 जून 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. स्कॉट अलेक्जेंडर यंग या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 


स्वीट टूथ 2 (Sweet Tooth 2)
कधी रिलीज होणार? 6 जून 2024
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


'स्वीट टूथ 2'मध्ये हिरण नामक एका मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर तो आईचा शोध घ्यायला लागतो. 6 जून 2024 रोजी नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज होणार आहे. नॉनसो एनोजी, कॉनवेरी, अदील अख्ता या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


गुल्लक सीझन 4 (Gullak 4)
कधी रिलीज होणार? 7 जून 2024
कुठे पाहता येईल? सोनी लिव्ह


'गुल्लक सीझन 4 'च्या माध्यमातून मिश्रा कुटुंबीय पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. प्रेक्षकांची आवडती सीरिज 7 जून 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. वैभव राज गुप्ता, हर्ष मायर, गीतांजली कुलकर्णी आणि जमील खान या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


द ब्यॉयज 4 (The Boys 4)
कधी रिलीज होणार? 13 जून 2024
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


'द ब्यॉयज'ची गोष्ट एका यूनिवर्सवर आधारित आहे. 13 जून 2024 रोजी प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. कार्ल अर्बन, जॅक क्वेड, एंटनी स्टार, एरिन मोरियार्टी, डेमिनिक मॅकएलिगॉट, जेसी अक्षर हे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


हाऊस ऑफ ड्रॅगन 2 (House of the Dragon 2)
कधी रिलीज होणार? 17 जून 2024
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार


गेम ऑफ थ्रोन्सची प्रीक्वल हाऊस ऑफ ड्रॅगन आहे. 17 जून 2024 रोजी फँटसी नाट्य असणारी ही सीरिज प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. पॅडी कोंसाइडीन, मैट स्मिथ, एम्मा डी आर्सी, राइस इफांस, स्टीव टूसेंट या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या


Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत