एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

अमृता फडणवीसांचे नवं गाणं 'वो तेरे प्यार का गम' प्रेक्षकांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'वो तेरे प्यार का गम' असे या गाण्याचे नाव आहे.

'डान्स महाराष्ट्र डान्स' लवकरच होणार सुरू

 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमासाठी बच्चेकंपनी उत्सुक आहे. कारण या कार्यक्रमाचं स्वरूप काहीस वेगळं असणार आहे. या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत संदीप पाठक दिसणार आहे. 

'सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे' रविवारी होणार ग्रँड प्रिमियर

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी रसिक श्रोते ज्याची चातकासारखी वाट पहात असतात तो रसिकजनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारा… मराठी संगीत रिॲलिटी शोमधील ‘मेरूमणी’ अर्थात कलर्स मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि दर्जेदार कार्यक्रम 'सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे' हे ब्रीद समोर ठेवून आपलं पाचवं लखलखतं पर्व घेऊन अवतरत आहे. 

'शमशेरा' ते 'अनन्या'; शुक्रवारी प्रदर्शित होणार बिग बजेट सिनेमे

सिनेसृष्टीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. नवनवीन विषयांवरचे सिनेमे दर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा शुक्रवारदेखील सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे. या शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या 'शमशेरा' आणि रजत कपूरच्या 'आरके' सिनेमाची टक्कर होणार आहे.

निखिल सिद्धार्थच्या 'कार्तिकेय 2'चा येणार सीक्वल

'कार्तिकेय' या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला असून या सिनेमाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2014 साली 'कार्तिकेय' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 'कार्तिकेय 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.

मणिरत्नम यांना कोरोनाची लागण

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे. आता दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांचे दिग्दर्शक मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एनसीबीकडून क्लीन चिट मिळालेला आर्यन खान मित्रांसोबत करतोय पार्टी; क्लबमधील व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची ड्रग्ज प्रकरणातून सुटका झाली. या प्रकणामुळे आर्यन खान चर्चेत होता. पण आता आर्यनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आर्यन खान पुन्हा चर्चेत आला आहे. आर्यन खानचा नाइटक्लबमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत.   

जॉनच्या 'तेहरान'मध्ये मानुषी छिल्लरची एन्ट्री

सम्राट पृथ्वीराज या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात करणारी मानुषी छिल्लर आता लवकरच एका नव्या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जॉन अब्राहमच्या 'तेहरान' या चित्रपटामध्ये आता मानुषी छिल्लरची एन्ट्री झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी  'तेहरान' चित्रपटामधील मानुषीच्या लूकचे फोटो रिलीज केले आहेत. 'तेहरान' चित्रपटामध्ये मानुषी प्रमुख भूमिका साकारणार आहे.

अदनान सामीचा सोशल मीडियाला रामराम?

पद्मश्री विजेता लोकप्रिय गायक अदनान सामी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून, ‘अलविदा’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची अलविदा ही पोस्ट पाहून चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. या पोस्टमुळे अदनान सामी याने इन्स्टाग्रामला अलविदा केला असावा, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, यावर अदनान याने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. अदनानने त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट हटवल्या असल्या, तरी ट्विटरवर मात्र सगळ्या पोस्ट दिसत आहेत.

हृता दुर्गुळेचा जबरा फॅन; दिली अनोखी भेट

'अनन्या' चित्रपटाच्या माध्यमातून हृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृताने अल्पावधीतच आपला फॅन फॉलोअर्स वाढवला. हृताचे असंख्य चाहते असून तिची एक झलक पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. बरेच चाहते तिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही संवाद साधतात आणि हृताही आपल्या चाहत्यांना अगदी आनंदाने प्रतिसाद देते. हृताच्या अशाच एका चाहत्याने तिला एक अनोखी भेट दिली आहे. या चाहत्याने हृताला 'अनन्या' नावाची एक सुंदर अंगठी भेट देऊन तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget