एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

'जल, वायु,अग्नी...'; अंगावर शहारे आणणारा ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि  आलिया भट्ट यांचे चाहते ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट उत्सुकतेने पाहात होते. या चित्रपटचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. आलियानं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमच्या ह्रदयाचा भाग- ब्रह्मास्त्र. 09.09.2022 रोजी लवकरच भेटूयात. '

'स्वयंवर मीका दी वोटी' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड गायक मिका सिंह त्याच्या लग्नासाठी उत्सुक आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबिय, मित्र आणि चाहते आनंदी झाले आहेत. मिका सिंहचा 'स्वयंवर मीका दी वोटी' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमामुळे तरी मिकाला आयुष्याचा जोडीदार मिळेल अशी चाहत्यांकडून आशा व्यक्त केली जात आहे. 

काळ्या-पिवळ्या टमटमऐवजी आता कार दिसणार!, ‘दे धक्का 2’चा भन्नाट टीझर पाहिलात का?

अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव यांच्या बहारदार विनोदाने सजलेल्या ‘दे धक्का’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. या चित्रपटाला आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत स्थान आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, कोरोनामुळे चित्रपटात खंड पडला होता. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘दे धक्का 2’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बिग बॉस ते निवडणुकीच्या रणांगणात झळकणारा अभिजीत बिचुकलेची एन्ट्री किचन कल्लाकारच्या मंचावर, तृप्ती देसाईदेखील येणार

'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात. पण 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात अभिजित बिचुकले, तृप्ती देसाई आणि जयवंत वाडकर येणार आहेत. 

‘बँड बाजा वरात’, आता सेलिब्रिटींचे लग्न होणार जोरात!

‘झी मराठी’वरील ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमाने अनेक नवं दाम्पत्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस अजून खास बनवला. आता या पर्वात प्रेक्षकांची लाडकी सेलिब्रिटी जोडपी सहभागी होणार आहेत. आपण नेहमी कलाकारांच्या लग्नाचा थाट फोटोज मधून पाहत आलो आहोत. पण, जर प्रत्यक्षात आपल्याला एका सेलिब्रिटी जोडप्याचं लग्न पाहायला मिळालं तर? हो.. आता हे शक्य आहे! नव्या ‘बँड बाजा वरात, सेलिब्रिटींच लग्न जोरात’ या कार्यक्रमामुळे हे शक्य होणार आहे.

Allu Arjun करणार 'पुष्पा द रुल' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द साइज' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे. तर या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता  'पुष्पा द रुल' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. 

456 स्पर्धक, 35 कोटींचे बक्षीस; नेटफ्लिक्सच्या नव्या 'स्क्विड गेम शो'ची घोषणा

2021 मधील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज 'स्किड गेम'ला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दक्षिण कोरियन सीरिजचा लवकरच दुसरा सिझन रिलीज होणार आहे. पण आता नुकतीच  नेटफ्लिक्सनं एक घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सचा स्क्विड गेम: द चॅलेंज हा नवा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये एकूण 456 स्पर्धक सहभागी होणार आहेत. नेटफ्लिक्सच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करुन या नव्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. 

बॉक्स ऑफिसवरील यशानंतर 'भूल भुलैय्या-2' ओटीटीवर होणार रिलीज; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनच्या भूल भुलैय्या-2  या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 175 कोटींचा टप्पा गाठला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. लवकरच हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

"वडील म्हणून दु:ख वाटतयं...", बाळाचा जन्मत: मृत्यू झाल्यानंतर गायक बी प्राकची भावूक पोस्ट

भारतातील लोकप्रिय गायक बी प्राकच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. बी प्राक आणि मीरा बच्चन दुसऱ्यांदा आई-वडील होणार होते. पण त्यांच्या बाळाचा जन्मत: मृत्यू झाला आहे. बी प्राकने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. 

पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा, ‘तारक मेहता...’मध्ये ‘दया भाभी’ परतली, पण...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे सगळेच चाहते दया भाभीच्या एन्ट्रीसाठी प्रचंड उत्सुक होते. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दया गोकुळधाम सोसायटीमध्ये परतताना दाखवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दयाबेन गोकुळधाममध्ये येत असल्याचं बोललं जात होतं. पण, त्यानंतर सुंदर पुन्हा नवी योजना बनवतोय हे ऐकून चाहत्यांना शंका आली आणि त्यांची शंका खरी ठरली. पुन्हा एकदा प्रेक्षकांची निराशा झाली आहे. कारण, दयाबेनचे पुनरागमन पुन्हा एकदा लांबणीवर गेले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
BMC Election Results 2026: राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
BMC Election Results 2026: राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
Embed widget