TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'पोटरा' सिनेमातील छकुली देवकरला एक लाखाची मदत
सध्या मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'कडे लागले आहे. हिंदी, मराठीसह अनेक भाषांतील सिनेमे या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. फ्रान्समध्ये 17 मे ते 28 मे दरम्यान 'कान्स चित्रपट महोत्सव' पार पडणार आहे. पोटरा, कारखानीसांची वारी, तिचं शहर होणं या तीन मराठी सिनेमांची या महोत्सवात निवड झाली आहे. अशातच 'पोटरा' सिनेमातील छकुली देवकरला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी एक लाखाची मदत केली आहे.
समंथा आणि विजय देवरकोंडाच्या 'खुशी'चे पोस्टर रिलीज
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री समंथा यांचा चाहता वर्ग मोठा आहे. दोघांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. या दोघांच्या 'खुशी' या चित्रपटाचे पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
'धर्मवीर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात
लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात केली आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कोट्यवधींची कमाई करत आहे. तीन दिवसांत या सिनेमाने 9.59 कोटींची कमाई केली आहे.
बहुचर्चित 'केजीएफ 2' आता घरबसल्या पाहा
साऊथ सुपरस्टार यशचा 'केजीएफ 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 400 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. सिनेमागृहात सध्या हा सिनेमा धुमाकूळ घालतो आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'गोदावरी'चा दबदबा
मराठी सिनेसृष्टीसाठी एक आनंदाची बाब आहे. कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर 'गोदावरी' सिनेमाची आता 'न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल'च्या ओपनिंग फिल्ममध्ये सिनेमाची निवड करण्यात आली होती. आता या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या जितेंद्र जोशीला 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2022' मध्ये सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Dhak Dhak Poster : 'धक धक' लवकरच होणार प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या चाहत्यांसाठी आता एका नवा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. तापसीचे प्रोडक्शन हाऊस आणि Viacom18 Studios संयुक्तपणे 'धक धक' हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे, जो खूपच जबरदस्त आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री रत्ना पाठक-शाह, फातिमा सना शेख , दिया मिर्झा आणि संजना संघी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
छोट्यांची मोठ्ठी गोष्ट सांगणारा 'येरे येरे पावसा'
'येरे येरे पावसा' हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्यांची मोठी गोष्ट सांगणारा 'येरे येरे पावसा' हा सिनेमा आहे. लक्षवेधी भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकणारा ‘हाफ तिकीट’ फेम विनायक पोतदार आणि ‘दशक्रिया’ फेम आर्य आढाव या सिनेमात दिसणार आहेत.
यूएईमध्ये होणारा IIFA पुरस्कार लांबणीवर!
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) द इंटरनेशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA)चा या वर्षीचा पुरस्कार सोहळा पार पडणार होता. पण आता या सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय आयफानं घेतला आहे. हा निर्णय यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांच्या निधनानंतर आयफा पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी घेतला आहे. शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांच्या निधनानंतर 40 दिवस यूएईमध्ये शोक व्यक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आयफानं पुरस्कार सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
जॉन अब्राहमचा 'अटॅक' ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जॉनच्या 'अटॅक' सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 27 मे ला हा सिनेमा 27 मे 2022 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'777 चार्ली' चा ट्रेलर रिलीज
दाक्षिणात्य चित्रपट सध्या जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. लवकरच '777 चार्ली' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टी हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य भाषांमध्ये तसेच हिंदी भाषेत देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये एका व्यक्तीचे श्वानासोबत असणारे नाते दाखवण्यात आले आहे.