Top 10 Thriller Web Series : गेल्या काही दिवसांत विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) रिलीज प्रदर्शित होत आहेत. घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. बोरिंग वीकेंडला मजेशीर किंवा मनोरंजनात्मक करायची तुमची इच्छा असेल तर 'या' टॉप 10 थ्रिलर वेब सीरिज नक्की पाहा.
1. रुद्रा (Rudra)
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार
अजय देवहन, राशि खन्ना आणि ईशा देओल स्टारर 'रुद्रा' ही सीरिज खूपच शानदार आहे. सायकोलॉजिकल थीमवर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये अश्विनी कलसेकर, तरुण गहलोत आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक ही सीरिज पाहू शकतात.
2. अरण्यक (Aranyak)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स
रवीना टंडन स्टार 'अरण्यक' ही परदेशी पर्यटकावर आधारित सीरिज आहे. रहस्यमय पद्धतीने पर्यटक गायब होते. या सीरिजमध्ये रवीना टंडनने एका महिला पोलीस अधिकारीची भूमिका साकारली आहे. ही सीरिज प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात.
3. असुर 2 (Asur 2)
कुठे पाहू शकता? जियो सिनेमा
'असुर'चा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजमध्ये अरशद वारसी, बरुण सोबती हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एका मुलाची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. जिओ सिनेमावर प्रेक्षक ही सीरिज पाहू शकतात.
4. आर्या
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार
सुष्मिता सेन अभिनीत आर्या ही सीरिज प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकतात. वाईट काम करणाऱ्या एका आईची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.
5. दहन (Dahan)
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार
अंधश्रद्धेवर भाष्य करणारी दहन ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये टिस्का चोप्राने एका महिला आयपीएस अधिकारीची भूमिका साकारली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
6. दहाड (Dahaad)
कुठे पाहू शकता? अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ
सोनाक्षी सिन्हा स्टार दहाड ही शानदार सीरिज आहे. ही बहुचर्चित सीरिज प्रेक्षक अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात.
7. कोड एम (Code M)
कुठे पाहू शकता? जियो सिनेमा
कोड एम ही एक थ्रिलर ड्रामा सीरिज आहे. या सीरिजमध्ये जेनिफर विंगेट आणि रजत कपूर मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज जिओ सिनेमावर प्रेक्षक मोफत पाहू शकतात.
8. सास बहू और फ्लेमिंगो
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार
'सास बहू और फ्लेमिंगो' या सीरिजमध्ये डिंपल कपाडिया, राधिका मदन, ईशा तलवार, दीपक डोबरियाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही थ्रिलर आणि गुन्हेगारीवर भाष्य करणारी सीरिज आहे.
9. द फॅमिली मॅन
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ
द फॅमिली मॅन ही सीरिज अॅक्शन, थ्रिलर आणि रहस्यमय आहे. मनोज वाजपेयी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षक ही सीरिज पाहू शकतात.
10. गन्स अॅन गुलाब्स
कुठे पाहू शकतात? नेटफ्लिक्स
गन्स अॅन गुलाब्स ही सीरिज गुलाबगंज नामक एका शहराची गोष्ट सांगणारी आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल.
संबंधित बातम्या