Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेनाचं (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नाट्यसंमेलन आणि रंगकर्मींचं एक अतुट नातं आहे. नाट्यसंमेलनादरम्यान रंगकर्मी मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतात. पण यंदाच्या नाट्यसंमेलनाला व्यावसायिक रुप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची नाट्यवर्तुळात चांगलीच चर्चा आहे. प्रत्येक नाट्यसंमेलनाला प्रायोगिक नाटक करत असलेल्या कलाकारांपासून ते व्यावसायिक रंगभूमी गाजवत असलेल्या कलाकारांपर्यंत अनेक रंगकर्मी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. प्रत्येक रंगकर्मी आपापल्या नाटकांच्या प्रयोगात वर्षभर व्यग्न असतो. या सर्व रंगकर्मींना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यात विचारांचं आदानप्रदान होण्यासाठी नाट्यसंमेलनाचा घाट घातला जातो. पण 100 व्या नाट्यसंमेलनाला मात्र व्यावसायिकरण आलं आहे.
नाट्यसंमेलनात व्यावसायिक नाटकांची संख्या अधिक
शकतमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या पुण्यातील उद्घाटनादरम्यान व्यावसायिक नाटकांची संख्या अधिक आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट, बोक्या सातबंडे (व्यावसायिक बालनाट्य), कट्यार काळजात घुसली, संगीत सौभद्र, अमेरिकन अल्बम, खरं खरं सांग, अडलंय काय, चाणक्य, घाशीराम कोतवाल, अस्तित्व या दहा व्यावसायिक नाटकांचे प्रयोग नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनादरम्यान होणार आहेत. तर दुसरीकडे पुनरुत्सथान, तेरवं, उच्छाद, गुड बाय किस, गेम ऑफ पॉवर, रा+धा आणि पालशेतची विहीर ही प्रायोगिक नाटकं प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
रंगकर्मींनी नाट्यसंमेलनाकडे फिरवली पाठ?
शकतमहोत्सवी नाट्यसंमेलन ही रंगकर्मींसाठी महत्त्वाची गोष्ट असतली तरी अनेक कलाकारांनी या नाट्यसंमेनाकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे पुण्यात नाट्यसंमेलनाचा शुभारंभ होत असताना मुंबई-पुण्यात विविध व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत आहेत.
'या' नाटकांचं नाट्यसंमेलनाकडे दुर्लक्ष
अलबत्या गलबत्या, कुर्रर्रर्र, करुन गेलो गाव, आमने-सामने, मुक्काम पोस्ट आडगाव, यदा कदाचित, ब्रँड अॅम्बॅसेडर, मी नथुराम गोडसे बोलतोय, छिन्न, माझ्या बायकोचा नवरा
नाट्यसंमेलनाच्या भव्य उद्घाटन सोहळा
शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा भव्य उद्घाटन सोहळा आज होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावळे अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, नाना पाटेकर, प्रेमानंद गज्वी आणि नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल ही मंडळी उपस्थित असतील. नाट्यदिंडीने अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची सुरुवात होणार आहे. या नाट्यदिंडीत अनेक कलाकार सहभागी होतील, अशी आशा आहे. या नाट्यसंमेलनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची 'नाटक आणि मी' या विषयावर मुलाखत होणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलन हस्तांतरण सोहळा पार पडेल.
संबंधित बातम्या