Indian Police Force Trailer : दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेबसिरिजची लोकांना कमालीची उत्सुकता आहे. शुक्रवारी (दि.5) या वेबसिरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. वेबसिरिजमधील कलाकारांचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केल्यानंतर आज ट्रेलर लाँच करत रोहितने प्रेक्षकांना सुखद धक्का दिलाय. इंडियन पोलीस फोर्सचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत 


बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शकांमध्ये रोहित शेट्टीचे नाव घेतले जाते. त्याने सिम्बा, सिंघम यांसारखे अनेक हिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. दरम्यान, आता रोहित शेट्टी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. त्याच्या इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरिजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत असणार आहेत. दरम्यान, इंडियन पोलीस फोर्सचा बहुप्रतिक्षेत ट्रेलर रोहितने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. 


ॲक्शनचा तडका पाहायला मिळणार 


'इंडियन पोलीस फोर्स' या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्येही आपलल्या अॅक्शन पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये शिल्पा शेट्टीही अॅक्शन करताना पाहायला मिळत आहे. इंडियन पोलीस फोर्स ही दिल्लीतील 3 पोलिसांची गोष्ट आहे. या पोलिसांचा सामना शक्तीशाली गुडांशी होतो. ट्रेलरमध्ये सिंघम आणि चेन्नई एक्सप्रेस प्रमाणे या वेबसिरिजमध्येही गाड्या हवेत उडताना दिसत आहेत. इंडियन पोलीस फोर्सचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. 


'या' दिवशी रिलीज होणार वेबसिरिज


इंडियन पोलीस फोर्स ही वेबसिरिज भारतात 19 जानेवारी 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय जगभरातील इतर देशातही याच दिवशी ही वेबसिरिज रिलीज होईल. ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमॅझॉन प्राईमवर ही सिरिज पाहाता येणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राने मिशन मजनूमध्ये रश्मिका मांदनासोबत काम केलंय. आता सिद्धार्थ दिशा पटानी आणि राशी खन्नासमवेत योद्धा या सिनेमात झळकणार आहे. विवेक ओबेरॉयच्या भूमिकेकडेही प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे. रोहित शेट्टीने ट्रेलर रिलीज झाल्याची पोस्ट इन्स्टाग्राम केली आहे. यामध्ये तो म्हणाला की, "The hunt begins 19th January onwards…
Indian Police Force, new series only on @primevideoin" 


 






इतर महत्वाच्या बातम्या 


Javed Akhtar: आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे आणि दोन-चार लोकांमुळे संपू शकत नाही: जावेद अख्तर