Lata Mangeshkar A. R. Rahman First Song Recording : एआर रहमान (A. R. Rahman) हे भारतीय मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार आहेत. आज ते आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहेत. एआर रहमान आणि लता मंगेशकर यांचं 'जिया जले' हे पहिलं गाणं आजही संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करतं. पण या गाण्याच्या रेकॉर्डदरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी काही अटी ठेवल्या होत्या.


आमिर खान आणि उर्मिला मातोंडकर अभिनीत 'रंगीला' या सिनेमाच्या माध्यमातून एआर रहमान यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत 1998 मध्ये त्यांचा संगीतप्रवास सुरू झाला. मणिरत्नम यांच्या 'दिल से' या सिनेमाच्या माध्यमातून लता मंगेशकर आणि एआर रहमान यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं. 


'दिल से' या सिनेमातील 'जिया गले' हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं आहे. एआर रहमान हे लता मंगेशकर यांचे मोठे चाहते होते. लहानपणी त्यांनी घरी लता दिदींच्या फोटोचं पोस्टर लावलं होतं. त्यामुळे लता दीदींसोबत काम करण्यासाठी एआर रहमान खूप उत्सुक होते. 


एआर रहमान फक्त चेन्नईमध्येच गाण्याचं रेकॉर्डिंग करत असे. पण लता मंगेशकर यांच्यासाठी ते खास मुंबईत येऊन गाणं रेकॉर्ड करण्यासाठी तयार होते. पण एआर रहमान यांना त्रास होऊ नये म्हणून लता मंगेशकर यांनी खास चेन्नईला जाऊन गाणं रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला होता. 


लता मंगेशकर यांची अट काय होती? 


लता मंगेशकर चैन्नईला जाऊन गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी तयार होत्या. पण एआर रहमान यांच्यासमोर त्यांनी एक अट ठेवली होती. गुलजार साहेबांच्या उपस्थितीतच मी गाणं रेकॉर्ड करेल, अशी अट लता मंगेशकरांनी ठेवली होती. गीतकार गुलजार लता दीदींना भावासारखे होते. 


एआर रहमानबद्दल जाणून घ्या.. (Who is A. R. Rahman)


एआर रहमान यांचं पूर्ण नाव अल्लाह रक्खा रहमान असं आहे. ते लोकप्रिय संगीतकार आहेत. रहमान यांनी विविध भाषांतील गाण्यांना संगीत देत देशभरातील संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती, अशा अनेक सुपरहिट सिनेमांना त्यांनी संगीत दिलं आहे. बाफ्टा, ग्रॅमी अशा संगीत क्षेत्रातील 130 पेक्षा नामांकित पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.


संबंधित बातम्या


A. R. Rahman: 'खराब ऑडिओ सिस्टिम, गर्दी आणि चेंगराचेंगरी', चेन्नईतील कॉन्सर्टनंतर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप; ए आर रहमान ट्वीट शेअर करत म्हणाला...