Tiger 3 Release Date: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफची (Katrina Kaif) जोडी चाहत्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या दोघांच्या 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल अर्थात ‘टायगर 3’ (Tiger 3) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटाची एक झलक आणि रिलीज डेट आधीच जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता चाहत्यांना या चित्रपटासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून, नवी तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. ‘टायगर 3’ हा चित्रपट आता पुढच्या वर्षी म्हणजे 2023मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.


सलमान आणि कतरिनाचा 'एक था टायगर' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर 'टायगर जिंदा है' हा चित्रपटाचा दुसरा भाग देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच ‘टायगर 3’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. सोबतच चित्रपटाचे नवे पोस्टरदेखील प्रदर्शित कण्यात आले आहे.


पाहा पोस्ट :



अभिनेता सलमान खान याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. सोबतच त्याने खास कॅप्शन देखील लिहिले आहे. ‘टायगरला आता नवा मुहूर्त मिळाला आहे आणि तो आहे दिवाळी 2023’चा!’ असं म्हणत त्याने हे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.


‘एक था टायगर’ला पूर्ण झाली 10 वर्ष!


यंदाच्या वर्षी ‘एक था टायगर’ या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने कतरिना आणि सलमान खान यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ‘टायगर 3’ची रिलीज डेट जाहीर केली होती. सुरुवातीला हा चित्रपट 21 एप्रिल 2023ला रिलीज होणार होता. मात्र, आता या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता हा चित्रपट 2023च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार हे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, त्याची निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही.


सलमान आणि कतरिना स्टारर 'एक था टायगर' या चित्रपटाचा पहिला भाग 2012मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाच्या पाच वर्षानंतर म्हणजेच 2017मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता ‘एक था टायगर’च्या 10 वर्षांनंतर चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा :