Tiger 3 Update : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या ‘टायगर 3’ (Tiger 3) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘दबंग’ खानच्या या चित्रपटाचे शूटिंग जवळपास संपले आहे. दररोज या चित्रपटाबाबत काही ना काही बातम्या समोर येत असतात. दरम्यान, आता बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सलमानच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.


गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, सलमान खानने मुंबईत शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'पठाण' (Pathaan)  चित्रपटासाठी त्याचा कॅमिओ शूट केला होता. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटासाठी, सलमानने रशियन माफिया, बंदुका, कार, हेलिकॉप्टर आणि ट्रेनसोबतच्या अॅक्शन सीनसाठी सुमारे 10 दिवस शूट केले होते. आता शाहरुख खान देखील त्याच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.


पुन्हा एकदा पाहायला मिळणार करण-अर्जुनची जोडी


शाहरुख खानही सलमानसोबत 'टायगर 3'चे शूटिंग जवळपास 10 दिवस करणार आहे. सलमानची 'पठाण'मध्ये हेलिकॉप्टरने एंट्री आहे. तर, 'टायगर 3'मध्ये शाहरुखसाठी खास इंट्रो सीन तयार केला जात आहे, ज्याची माहिती सध्या पूर्णपणे लपवून ठेवण्यात आली आहे. ‘पठाण’ आणि ‘टायगर 3’च्या निमित्ताने 2023 साली एकदा नव्हे, तर दोनदा 'करण-अर्जुन' एकत्र पाहायला मिळणार आहेत.


शूटची तयारी सुरु!


चित्रपटाचे मेकर्स जूनमध्येच हे सीन शूट करण्याचा विचार करत आहेत. तर, सलमान आणि शाहरुख या दोन्ही स्टार्सच्या तारखांनुसार पुढची तयारी देखील सुरू झाली आहे. हा संपूर्ण सीक्‍वेन्‍स जुलैच्‍या अखेरीस किंवा ऑगस्‍टच्‍या सुरूवातीला शूट केला जाणार असल्‍याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आहे. शाहरुखचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर, सलमान खानचा ‘टायगर 3’ ईदला रिलीज होण्याची तयारी करत आहे. ‘पठाण’मध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत, तर टायगर 3 मध्ये सलमानसोबत कतरिना आणि इमरान हाश्मी झळकणार आहेत.


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.


हेही वाचा :