Munawar Fauqui : विनोदवीर मुनव्वर फारुकी (Munawar Fauqui) सध्या चर्चेत आहे. नुकताच मुनव्वर कंगनाच्या 'लॉक अप'चा (Lock Up) विजेता बनण्यात यशस्वी झाला आहे. मुनव्वर आता 'खतरों के खिलाडी 12' मध्ये दिसणार आहे. तसेच त्याला 'बिग बॉस ओटीटी 2' साठीदेखील विचारणा झाली आहे. 


रिपोर्टनुसार, मुनव्वर फारुकीला 'बिग बॉस ओटीटी 2' साठी विचारण्यात आले आहे. करण जौहरने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन केले होते. मुनव्वर फारुकी बिग बॉससाठी एक उत्तम स्पर्धक असू शकतो, असेही चाहत्यांकडून म्हटले जात आहे. मुनव्वर विनोदवीर असण्यापासून लॉक अपचा विजेता बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास संघर्षमय होता.





मुनव्वर फारुकी 'खतरों के खिलाडी 12' मध्ये दिसणार आहे की  'बिग बॉस ओटीटी 2' दिसणार याकडे मुनव्वरच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मुनव्वरला 'लॉक अप'च्या ट्रॉफी व्यतिरिक्त 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एर्टिगा गाडी आणि इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे. 


संबंधित बातम्या


Cirkus : रणवीर सिंहच्या 'सर्कस'चे पोस्टर रिलीज; नाताळात सिनेमा होणार प्रदर्शित


Avatar 2 : एक-दोन नव्हे 'अवतार'चे तब्बल चार सिक्वेल येणार, प्रत्येकात दिसणार निळ्या विश्वाची जादू!


Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!