Avatar 2 : नुकताच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar 2) या अवतार चित्रपटाच्या सीरिजमधील दुसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट  6 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अवतार या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचे लवकरच चार भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पाहूयात या सिक्वेल्सची नावं...


अवतार-2 म्हणजेच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' नंतर 20 डिसेंबर 2024 रोजी अवतार-3 रिलीज होणार आहे. अवतार-3 चं नाव 'द सिड बेअरेर' असं असणार आहे. तसेच अवतार 4 हा चित्रपट देखील 18 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होणार असून या चित्रपटाचं नाव 'द कुलकून रायडर' असं असणार आहे. तर अवतार-5 चित्रपटाचं नाव the quest for eywa असं असणार आहे.हा चित्रपट 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे. Culture Crave या ट्विटर अकाऊंटवरुन या सिक्वेल्सची माहिती देण्यात आली आहे. 






‘अवतार’  या चित्रपटाचा पहिला पार्ट 2009मध्ये प्रदर्शित झाला होता. आता दुसऱ्या आणि पुढील प्रत्येक पार्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 


हेही वाचा :