The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) ब्लॉकबस्टर चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'ने (The Kashmir Files) थिएटरमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची जगभरात जोरदार चर्चा झाली. पण, आता हा बहुचर्चित चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. हा चित्रपट वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. रिलीजपूर्वीच 'द कश्मीर फाइल्स' अनेक वादांमुळे चर्चेत आला होता. असे असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण, आता विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे.


सिंगापूरमध्ये 'द कश्मीर फाइल्स'वर बंदी घालण्यात येणार आहे. याचे कारण चित्रपटात दाखवण्यात आलेली तोडफोड असल्याचे म्हटले जात आहे. ‘द काश्मीर फाइल्स' शहर-राज्य मार्गदर्शक तत्त्वांच्या कक्षेबाहेर आहे. अहवालात अधिकाऱ्यांनी सांगितले की, चित्रपटात मुस्लिमांचे चिथावणीखोर आणि एकतर्फी चित्रण आहे. यासोबतच काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम संघर्षात हिंदूंचा होणारा छळही एकतर्फी आहे, या गोष्टी नियमांविरुद्ध आहेत. 'द कश्मीर फाइल्स' सिंगापूरच्या चित्रपट वर्गीकरण मार्गदर्शक तत्त्वांच्या पलीकडे असल्याचे म्हटले आहे.



'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 339.49 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अवघ्या 14 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. या चित्रपटात पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


हेही वाचा :