Movies : नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक गोष्टी आहेत. या आठवड्यात प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या अनेक सिनेमांचे ट्रेलरदेखील प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये हॉलिवूड तसेच बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी आता मनोरंजनाची चांगली मेजवानी असणार आहे. या यादीत अक्षय कुमारच्या पृथ्वीराज सिनेमाचादेखील सहभाग आहे.
डोंट लूक अप (Don’t Look Up) : लिओनार्डो डिकॅप्रियोचा हा आगामी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात हवामान बदलामुळे लिओनार्डो डिकॅप्रियो त्रस्त दिसणार आहे. सिनेमात जेनिफर लॉरेन्स एक मनमौजी पात्र साकारणार आहे.
पृथ्वीराज ( Prithviraj) : पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह संजय दत्त आणि सोनू सूद महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या सिनेमात 'संयोगिता'च्या भूमिकेत असणार आहे.
छोरी (Chhorii) : छोरी हा एक भयपट आहे. हा सिनेमा मराठीतील लपाछुपी सिनेमावर आधारित आहे. या सिनेमा एका जोडप्याच्या आयुष्यावर भाष्य करतो. सिनेमातील स्त्री गर्भवती आहे.
मोरबिअस (Morbius) : मार्वलने त्याच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरवरून प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. ट्रेलरवरून सिनेमाचा अंदाज येत आहे.
संबंधित बातम्या
Marathi Films : 'देर आये दुरुस्त आये' म्हणत मराठी सिनेमांनी घातला Box Officer धूमाकूळ
यंदाचा रविवारी प्रेक्षकांसाठी ठरणार खास, प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांचे रंगणार एक तासाचे विशेष भाग
Bigg Boss 15 : Karan Kundra आणि Tejasswi Prakash दरम्यान वाढला दुरावा, 'या' स्पर्धकामुळे तुतली जोडी
Bob Biswas Movie Trailer : Abhishek bachchan च्या 'बॉब बिस्वास' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha