Amruta Fadanvis New Song : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या कायम चर्चेत असतात. आओ कुछ तुफानी करते है कल शाम...मी पुन्हा येत आहे, असं ट्विट अमृता फडणवीसांनी काल केले होते. त्यांच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर चांगलाच सस्पेन्स पाहायला मिळाला. पण आज त्यांनी त्यांचे नवे गाणे प्रदर्शित केले आहे. 


गेली अनेक वर्षे मिसेस मुख्यमंत्री म्हणून असलेली ओळख अमृता फडणवीसांनी बदलली आहे. अमृता फडणवीस या एक गायिका असून त्यांच्या आवाजातील अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. नदी स्वच्छता मोहिमेवर अमृता फडणवीसांनी केलेल्या गाण्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. अमृता फडणवीसांनी 'तिला जगू द्या' हे गाणे सोशल मीडियावर शेअर भाऊबीजेनिमित्त शेअर केले होते. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीसांनी नवे गाणे प्रदर्शित करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.





 'मानिके मागे हिते' सोशल मीडियावर व्हायरल 
योहानीने  गायक-संगीतकार सतीशनसोबत Manike Mage Hite हे गाणं 22 मे रोजी यूट्यूब चॅनेलवर लाँच केलं. हळूहळू हे गाणे सुपरहिट झालं असून केवळ श्रीलंकेतच नव्हे, तर भारतासह इतर देशांमध्येही हे गाणं खूप व्हायरल झाले आहे. युट्यूबवर 30 ऑगस्ट पर्यंत, Manike Mage Hite या गाण्याला YouTube वर 75 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले.


संबंधित बातम्या


Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच देवेंद्र फडणवीसांना ॲनिव्हर्सरी गिफ्ट, नव कोरं गाणं रिलीज


Amruta Fadnavis : माझ्या अंगावर कुणी आलं तर त्याला सोडणार नाही : अमृता फडणवीस


Bob Biswas Movie Trailer : Abhishek bachchan च्या 'बॉब बिस्वास' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha